जाहिरात

Akola News: धावत्या एसटी बसची 2 चाकं झाली वेगळी, त्यानंतर चालकाने जे काही केलं ते...

चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांच्या सतर्कतेने व धैर्याने 70 ते 100 प्रवाशांचा जीव वाचला.

Akola News: धावत्या एसटी बसची 2 चाकं झाली वेगळी, त्यानंतर चालकाने जे काही केलं ते...
अकोला:

योगेश शिरसाट

तेल्हारा हे अकोला जिल्ह्यातील एसटीचे आगार आहे.  या आगारात आज रविवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. एमएच-40 एन 9973 या एसटी बसची चारही चाके धावत्या गाडीतूनच अक्षरशः वेगळी झाली. क्षणभरात प्रवाशांचा मृत्यू समोर उभा राहिला होता. मात्र चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांच्या सतर्कतेमुळे 70 प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात झाला त्यावेळी क्षणभर सर्व प्रवाशांनी आपला जीव मुठीत ठेवला होता. पण त्यांचे नशिब चांगले होते. त्यामुळे मोठा अपघात टळला. शिवाय सर्वांचे जीवही वाचले. 

तेल्हारा आगारातून निघालेली बस नेर –पंचगव्हाण –अकोला मार्गावर धावत होती. नेर-नांदखेड गावाजवळ गाडी हळुवार वेगाने पुढे जात असतानाच अचानक बसने कंडक्टर साईडने झटका घेतला. या धक्क्याने चालकाने त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच बस चालक साईडला झुकू लागली. त्या क्षणीच चालकाने दाखवलेल्या धैर्याने आणि कौशल्याने बस पलटी होण्यापासून वाचली.

नक्की वाचा-  Akola News: 'अपघात झालाय, पैशांची मदत करा!', एकनाथ शिंदेंना थेट कॉल, पण सत्य समोर येताच...

अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तपासात समोर आले आहे की बसच्या मागील चार चाकांपैकी दोन चाके अक्षरशः अॅक्सलसह सुटली होती. गाडीच्या मागील बाजूच्या तीन पाट्या तुटल्यामुळे बस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तरीही चालकाच्या नियंत्रणामुळे गाडी थांबवण्यात यश आले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर तेल्हारा आगाराच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

नक्की वाचा - EXCLUSIVE: दाऊदचा भाऊ इकबाल कासकर समुद्रकिनारी जायला का घाबरायचा? प्रदिप शर्मांनी सांगितला भन्नाट किस्सा

चालत्या बसचे चाके अॅक्सलसह वेगळे होणे ही गंभीर तांत्रिक त्रुटी आणि देखभालीतील निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवाशांनी आणि स्थानिकांनी यावर संताप व्यक्त करत तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या भीषण प्रसंगात चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांच्या सतर्कतेने व धैर्याने 70 ते 100 प्रवाशांचा जीव वाचला. प्रवाशांनीही देवाचे आणि चालकाचे आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे. जर वेळेत गाडी थांबवली गेली नसती, तर आज एक मोठी दुर्घटना घडली असती.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com