अविनाश पवार, राजगुरुनगर
जमिनीचा ताबा घेण्यासाठी निवृत्त पोलीस आधिकाऱ्याने गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रानमळा येथील ही घटना आहे. अनिल शिंदे असे फायरिंग करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकूण 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भावकीतील जमिनीचा ताबा घेण्यासाठी निवृत्त पोलीस आधिकाऱ्याने पिस्तूल काढून 4 गोळ्या हवेत फायर केल्या. यानंतर पिस्तुलाची दहशत दाखवत जमिनीचा ताबा घेऊन जेसीबीच्या साह्याने झाडे झुडपे तोडली.
(नक्की वाचा - चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले)
तक्रारदार ओंकार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल शिंदे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. सदर जागा आमची आहे, तुम्ही येथे काही काम करु नका असा दम आम्हाला भरला. तुमचा इथे संबंध नाही, तुम्ही या जमीनीत यायचे नाही असं म्हणत आम्हाला शिविगाळ, दमदाटी केली आहे.
(नक्की वाचा- 'तुमचं कुरियर आलंय..'ज्येष्ठ नागरिकाला 5 दिवस केलं ब्लॅकमेल करत 1.3 कोटी लुबाडले!)
तक्रारीनंतर खेड पोलिसांनी कलम 336, 504, 506, 34 आर्म अॅक्ट 3, 25 अन्वये अनिल शिंदे, अजित शिंदे आणि शाकुबाई वाघोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अद्याप अटक झालेली नाही. पोलीस याबाबत सविस्तर तपास करत आहेत.