Pandharpur News : पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना अघटित घडलं, 51 वारकऱ्यांच्या एसटीचा भीषण अपघात

आषाढी एकादशीनिमित्ताने पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याचं समोर आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Warkari bus accident : आषाढी एकादशीनिमित्ताने पांडुरंगाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर वरून परतणाऱ्या एसटी बसचा आज पहाटे 2 वाजता भीषण अपघात झाला. पंढरपूरवरही ही एसटीबस निघाली होती. 

ही बस डिव्हायडरला धडकून पलटली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाचं दर्शन करून परतणारे 52 वारकरी होते. एम एच 40, वाय 5830 क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूरवरून येत होती. पहाटे दोन वाजेच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिव्हायडरला धडकली.

नक्की वाचा - Nagpur Crime : राजाबाबू टायरवाल्यासाठी पतीला संपवलं; पोस्टमॉर्टम अहवालातून दिशाचं दुष्कृत्य उघड

या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली. अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झालं आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र 10 ते 15 वारकरी जखमी झाले. त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर स्थानिकांनी मदत कार्य राबवले. चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.


 

Topics mentioned in this article