जाहिरात

Love affair: 'पत्ती पत्नी और वो'चा हा खूनी ट्रँगल! वर्षभरातल्या अंगावर काटा आणणाऱ्या पतींच्या हत्या

गेल्या काही वर्षात 'पती पत्नी आणि वो' चा हा खूनी ट्रँगल अधिकच भयानक होत चालला आहे.

Love affair: 'पत्ती पत्नी और वो'चा हा खूनी ट्रँगल! वर्षभरातल्या अंगावर काटा आणणाऱ्या पतींच्या हत्या
मुंबई:

पती, पत्नी आणि वो. हा ट्रँगल हल्ली फारच भयानक झाला आहे. कारण गेल्या काही महिन्यात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यात पत्नीनेच पतीचा काटा काढला आहे. ऐवढेच नाही तर हत्या लपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने मास्टर प्लॅन ही आखले आहे. त्यांचे प्लॅन पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत. सोनम रघुवंशी हीने आपल्या पतीची हनिमुनला गेले असता हत्या केली. त्यानंतर पत्नीने पतीची हत्या केल्याची प्रकरणे पुन्हा एकदा चर्चीली जात आहेत. या वर्ष भरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचाच काटा काढला गेला आहे. अशाच काही खतरनाक हत्यांबाबत आपण आवाढा घेणार आहोत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मेरठचं ड्रम हत्याकांड 
मेरठचं ड्रम हत्याकांड कुणीही विसरले नसेल.या हत्याकांडानं देशाला हादरवून सोडलं. या हत्याकांडातील दोन चेहरे. हे दोन चेहरे कुणीही विसरले नसतील. एक मुस्कान रस्तोगी आणि दुसरा साहिल शुक्ला. या दोघांनी जो कांड केला त्याने अख्खा देश हादरला होता. मार्च महिन्यात उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये हे हत्याकांडं घडलं होतं. 29 वर्षीय सौरभ राजपूत या विवाहित तरुणाचा मृतदेह एका ड्रममध्ये सापडला. तपासाअंती सौरभच्या पत्नीनेच म्हणजे मुस्कानने प्रियकरासोबत हा खून केल्याचं उघड झालं होतं. पण मृतदेह लपवण्यासाठी ड्रमचा वापर करणं हे फारच धक्कादायक होतं. या घटनेनंतर मेरठमध्ये ड्रमची दहशत इतकी वाढली की, घरात निळा ड्रम पाहिला की पुरुषांना धडकी भरायची. एवढच नाही तर महिलांनी पतीला मारून ड्रममध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्याचेही प्रकार घडले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: ज्या 'राज'साठी राजाचा जीव गेला , तोच आला समोर, खतरनाक प्रेम कहाणी

मेरठचं सर्पकांड
मेरठ शहरात ड्रम हत्याकांडाच्या आठवणी पुसल्या नव्हत्या तोच आणखी एक हत्या प्रकरण समोर आलं. पण यावेळी पत्नीने वेगळीच शक्कल लढवली होती. या प्रकरणातले आरोपी प्रेमी जोडं होतं. रविता आणि अमरदीप. दोघांचं प्रेम प्रकरण रविताचा पती अमितला कळालं होतं. म्हणून दोघांनी गळा दाबून अमितची हत्या केली. आणि हत्येला लपवण्यासाठी सर्पदंशाचा बनाव रचला. रविताने एका सर्पमित्राकडून हजार रुपयात विषारी साप आणला. त्याला पतीच्या मृतदेहाजवळ सोडलं. सुरुवातीला पोलिसांनाही सर्पदंशानेच मृत्यू झाल्याचं वाटलं. पण हळूहळू तपास पुढे गेल्यानंतर या प्रेमी जोडप्याचं पितळ उघडं पडलं. हा एक विचारपूर्वक केलेला खून होता. तो ही प्रियकराला हाताशी धरून. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: हनिमूनपासून हत्येपर्यंत! सोनम रघुवंशीनेच रचला होता हत्येचा कट? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

बुरहानपूरचं बियर बॉटल कांड
मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये 17 वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला. या हत्या प्रकरणात पत्नीने बियरच्या बाटलीचा वापर केला होता. अल्पवयीन पत्नी आणि तिचा प्रियकर युवराज पाटीलने मिळून, पती राहुल कुमारचा काटा काढायचा ठरवलं होतं. हे जोडपं खरेदी केल्यानंतर बाइकवरून घरी परतत होतं. यावेळी पत्नीने चप्पल खाली पडल्याचा बहाणा केला. त्यानंतर पती राहुल कुमारने गाडी थांबवली. त्यानंतर पत्नीच्या प्रियकराच्या दोन मित्रांनी त्याला घेरलं. पत्नीने राहुलच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली. फोडलेल्या बियरच्या बाटलीनं 36 वेळा मृत राहुलवर वार करण्यात आले. ऐवढेच नाही तर हत्येनंतर प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन काम हो गया असा मॅसेज ही दिला. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट, सोनमने सांगितलं त्यावेळी नक्की काय झालं...

नालंदाचं कुंभमेळा कांड
पुढचं हत्याकांड बिहारच्या नालंदामध्ये घडलं होतं. नालंदामध्ये संध्यादेवी आणि राजीव हे विवाहित जोडपं रहात होतं. पण बरेच दिवस राजीव कुणालाच दिसला नाही. लोकांनी विचारपूस केली. तेव्हा पत्नीनं सागितलं तो कुंभमेळ्याला गेला आहे. थोड्या दिवसांनी गावाशेजारील जंगलात काही कुत्रे एका मृतदेहाचे लचके तोडत होते. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलीसही दाखल झाले. तपासानंतर तो मृतदेह राजीवचा असल्याचं कळलं. संध्या देवी आणि तिचा प्रियकर नितीश कुमारने हे कांड घडवलं होतं. राजीव दारू पिऊन त्याची पत्नी संध्यादेवीला मारहाण करायचा. याच रागातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने राजीवचा खेळ खल्लास केला. 

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: लव्ह, गोल्ड अन् मर्डरची स्क्रिप्ट! शिलाँगमध्ये रचला गेला कट, सोनमनेच दिलं होतं लोकेशन?

या सर्वच प्रकरणांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे गेल्या काही वर्षात 'पती पत्नी आणि वो' चा हा खूनी ट्रँगल अधिकच भयानक होत चालला आहे. हत्या लपवण्यासाठी ज्या युक्त्या लढवल्या जातायत त्या फारच भयानक आहेत. पोलिस ही या युक्त्या पाहून हैराण झाले आहेत. ऐवढं प्लॅनिंग कसं केलं जातं असा प्रश्न सर्वच जण करत आहे. या सर्व घटनांमध्ये पीडित हे पती आहेत. पत्नीकडून पतीला टार्गेट केलं जात आहे. त्यासाठी मदतीला प्रियकर असल्याचं प्रत्येक घटनेत दिसून आलं आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com