धुळ्यात भरदिवसा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखलं..थरारक CCTV Video आला समोर

Robbery At Petrol Pump Viral Video :  धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झालाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Robbery CCTV Video
मुंबई:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Robbrery At Petrol Pump Viral Video :  धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. दोन ते तीन जणांनी पिस्तुलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि कार्यालयातून 15 ते 20 हजारांची रोख रक्कम चोरली, अशी माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर धुडगूस घातला होता. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात नाना भिवा मारणर हा कर्मचारी जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, पेट्रोल पंपाच्या कार्यालयात दरोडेखोर घुसल्यानंतर त्यांनी पिस्तुलच्या धाकाने कर्चाऱ्याला धमकावल्याचं समोर आलं आहे. दोन दरोडेखोरांच्या हातात पिस्तुल असून एका कर्मचाऱ्यावर या दरोडेखोरांनी पिस्तुल रोखल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी भीतीपोटी कार्यलयात खाली बसतो. त्यानंतर हे दरोडेखोर कार्यालयात असणाऱ्या ड्रॉव्हरमधून रोख रक्क लंपास करतात. तर दुसरा दरोडेखोर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष ठेवत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> Anaya Bangar : गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

इथे पाहा दरोडेखोरांचा धक्कादायक व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यात दरोड्याच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर पिस्तुलचा धाक दाखवून रक्कम लंपास केल्याची घटना घडली. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं समोर आलं आहे. दरोडेखोरांनी पंपावरील कार्यालयात डल्ला मारून पळ काढला. या पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. दरोडेखोरांच्या भयंकर कृत्याचा व्हिडीओ पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Optical illusion Test : तुम्हाला या फोटोत आंबे दिसतात? पण कुठंतरी एक पोपटही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा

Topics mentioned in this article