पुण्यात एकामागून एक अशा घटना घडत आहेत की, ज्यामुळे पुण्यात चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कधी पोर्शे कारचा अपघात तर कधी नशेबाजी, कधी कोयता गँगचा धुमाकूळ तर कधी गाड्यांची फोडतोड. आता तर दिवसाढवळ्या ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला आहे. तीन जणांनी पिस्तूसाचा धाक दाखवत हा दरोडा टाकला आहे. या दरोड्यात ते ज्वेलरी घेवून पसार झाले आहेत. या दरोड्याचा धरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिवसाढवळ्या पुण्या सारख्या शहरात ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला आहे. पुण्याच्या हिंडवडीमध्ये लक्ष्मी चौक आहे. या चौकात शिवमुद्रा हे ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात दुकानदार एकटाच होता. त्यावेळी तीन जण दुकानात घुसलेय. सर्वात आधी घुसलेल्या दरोडेखोराने थेट पिस्तुल बाहेर काढले. पिस्तुलचा धाक दुकानदाराला दाखवत ते त्याच्यावर रोखले. दुकानदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.त्याच वेळी आणखी दोघे जण दुकानात घुसले. त्यांनी ही दुकानदाराला धमकावले.
ट्रेंडिंग बातमी - ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
पिस्तुलाच्या धावावर या तीन दरोडेखोरांनी ज्वेलरी शॉप लुटले. त्यात ते सोने चांदीचे दागिने घेवून पसार झाले. घटनेनंतर हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाले आहे. या अशा घटनाना पोलिसांनी पायबंद घालावा अशी मागणी होत आहे. दरम्यान हे दरोडेखोर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पण पुण्यात अशा घटना वारंवार होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.