वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांवर दोघांनी चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या जवळ असलेले 1 कोटी 20 लाख रुपये लुटले. ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे यांनी ही रक्कम बँकेतून काढली होती. त्यानंतर हे दोघे 1 कोटी 20 लाखांची रक्कम घेऊन विठ्ठल मार्केटकडे घेऊन जात होते. त्याच वेळी हिंगोली महामार्गावरील उड्डाण पुलावर पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला. काही समजण्या आत त्यांच्याकडून त्यांनी पैसे लुटून पोबारा केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर बयस आणि विठ्ठल हजारे हे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांकडून जागोजागी नाकेबंदी केली जात आहे. त्यातून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाशिममध्ये एवढी मोठी रक्कम लुटण्यात आल्यानं व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्या चोरांना लवकर पडकडले जावे अशी मागणी व्यापारी करत आहेत.
आठवडाभरातील वाशिम शहरातील ही तिसरी मोठी घटना आहे. या आधी विधान परिषदेचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या घरातून लाखो रुपयांची चोरी झाली होती. तर दुसऱ्या घटनेत एका व्यापाराच्या घरातून 37 लाख रुपयांची भर दिवसा चोरी झाली होती.वाशिम शहरात सतत घडत असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यात आता या चोरांना पायबंद घालण्याची मागणी होत आहे. शिवाय त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसां समोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world