 
                                            Rohit Arya Encounter 17 children Hostage kidnapping Case: मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या किडनॅपकांड आणि एन्काऊंटरने राज्यात खळबळ उडाली आहे. पवई परिसरातील आर ए स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली बोलावून 16 जणांना रोहित आर्या या व्यक्तीने ओलीस ठेवले होते. अखेर मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करत मुलांची सुटका केली. या रोहित आर्याचे पैसे राज्य सरकारने बुडवल्याने त्याने धक्कादायक कृत्य केलाचा दावा करण्यात येत आहे. अशातच आता त्याचे पणे कनेक्शनही समोर आले आहे.
रोहित आर्याचे पुणे कनेक्शन...
रोहित आर्या हा कर्वेनगरच्या अमेय अपार्टमेंटमध्ये रोहित वास्तव्याला होता. तर कोथरुड परिसरातल्या शिवतीर्थनगरमधल्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडिल राहत होते. कर्वेनगरमधलं अमेय अपार्टमेंट रोहितने 1 वर्षांआधीच सोडलं होते. मात्र स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडिल राहत होते. त्याची पत्नी एका नामांकित बँकेत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. रोहित आणि त्याची बायको आई वडिलांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंटमध्ये येत असतं. स्वरांजली अपार्टमेंटमधलं घर हे हरोळीकर नावाने आहे. त्यामुळे रोहित आर्याचं मुळ नाव रोहित हरोळीकर असल्याचं समोर आले आहे.
17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या लेटरबॉम्बने उडवली खळबळ! काय होतं सरकारचं कनेक्शन?
गँगस्टरशी दोस्ती...
तसेच रोहित आर्या याची गँगस्टर हाजी मस्तान यांच्या मुलासोबत ओळख होती आणि त्यांच्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी मिळून पुण्यात बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. कोथरूड, बाणेर आणि हिंजवडी परिसरात 3 त्यांनी काही मोठे प्रकल्प हाताळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकल्पांमधून त्यांना मोठा नफा मिळाला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरता प्राप्त झाली.
रोहित आणि त्याचे सहकारी पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत करत होते. त्यामुळे त्यांचा राजकीय व व्यावसायिक प्रभाव पुण्यात वेगाने वाढत चालला होता. तो कोथरूड परिसरात वास्तव्यास होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र गुरुवारी त्याच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले तसेच सोसायटीतील इतर स्थानिकांनी त्याच्याबाबत बोलण्यास नकार दिला.
 
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
