रोहीत आर्या याचा मुंबई पोलीसांनी एन्काऊंटर केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबईत पुन्हा एका एन्काउंरचा थरार अनुभवायला मिळाला. हा एन्काऊंटर मुंबईच्या पवई या भागात झाला. लहान मुलांना बंधक बनवण्याच्या घटनेपासून याची सुरूवात झाली. जवळपास अडीच तास हा थरार चालला. शेवटी अडीच तासांनी मुंबई पोलीसांनी रोहीत आर्याला गोळ्या घातल्या. या अडीच तासात काय काय घडलं याचा आपण आढवा घेणार आहोत.
पवईत आरए स्टुडीओ आहे. त्या स्टुडीओत याच रोहीत आर्या याने 17 लहान मुलांना बंधक बनवले. त्याआधी त्याने एक व्हिडीओ बनवला होता. त्यात त्याने मुलांना बंधक बनवले असल्याची माहिती दिली. ही माहिती तातडीने स्थानिक पोलीसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलीस तातडीने घटना स्थळी पोहोचले. स्पेशल युनिटला ही पाचारण करण्यात आलं. लहान मुलांच्या जीवाचा प्रश्न होता. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. त्यातून त्यांनी आर्या याच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी चर्चा सुरू केली.
नक्की वाचा - Rohit Arya Encounter : कोण होता रोहित आर्या? सर्वांना हादरंवून टाकणारी माहिती आली समोर!
पण रोहीत आर्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मुलांना सोडून द्यावे. तुमची मागणी पूर्ण केली जाईल असं आश्वासन त्याला दिलं जात होतं. चर्चा सुरू होती. पण रोहीत काही ऐकत नाही हे पोलीसांच्या लक्षात आलं. शिवाय तो कोणतं ही टोकाचं पाऊल उचलू शकतो याचा अंदाज पोलीसांना आला. शिवाय त्याच्याकडे शस्त्र ही होती. त्यामुळे ते जास्त धोक्याचं होतं. त्यामुळे स्टुडीओ असलेल्या इमारतीत छुप्या मार्गाने घुसण्याचा पोलीसांनी निर्णय घेतला. त्यासाठी इमारतीतील रहिवाशांची मदत घेण्यात आली. एकीकडे पोलीसांनी रोहीत याला बोलण्यात गुंतवून ठेवले होते.
तर दुसरीकडे पोलीसांनी इमारतीत घुसण्याची तयारी केली. त्यानंतर रोहीत असलेल्या स्टुडीओत एका बाथरूममधून पोलीसांनी प्रवेश केला. आता घुसल्याची खबर रोहीतला लागली. त्यानंतर तो अजून आक्रमक झाला. त्याने काही मुलांच्या डोक्यावर ही गन ठेवली. नंतर त्याने कोणताही विचार न करता एअर गनमधून पोलीसांवर फायरींग करायला सुरूवात केली. पोलीसांवर झालेल्या फायरींगला पोलीसांनी फायरींगच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक गोळी रोहीतच्या छाती जवळ लागली. त्यात तो जबर जखमी झाला.
त्यानंतर पोलीसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला ताब्यात घेवून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यानच त्याला मृत घोषीत करण्यात आले. हा सर्व थरार जवळपास अडीच तास चालला. पोलीसांनी संयमाने आणि अतिशय चपळाईने ही कारवाई केली. त्यानंतर त्या सतरा लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. सर्व मुलांना स्टुडीओ बाहेर आणण्यात आलं. रोहीतचा एन्काऊंटर झाल्यानंतर बाहेर आलेल्या पोलीसांच्या अंगावरही रक्त पाहायला मिळालं. रोहीत आर्या हा प्रोजेक्ट लेस्ट चेंज या संस्थेचा संस्थापक होता.