सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलीस बिहारला पोहोचले आहेत. अटक केलेल्या दोन हल्लेखोरांजवळील पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्च आणि वांद्रे पोलीस ठाण्याचे पोलीस सोमवारी रात्री उशिरा गौनाहातील मसही गावात पोहोचले. गौनाहा पोलिसांच्या मदतीने पाच लोकांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे आणि त्यानंतर तातडीने आरोपींच्या या पाच साथीदारांना घेऊन रवाना झाले आहेत.
विक्कीचे वडील साहेब साह यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नरकटियागंजमध्ये सोडण्यात आलं. यादरम्यान पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली. ज्या तरुणांना मुंबई पोलीस आपल्या सोबत घेऊन गेले त्यामध्ये आशीष उर्फ खालीफ, अंकित चौहान, संजीत चौहान, सुनील कुमार आणि शूटर विक्की यांच्या पत्नीचा भाऊ विकास कुमार सामील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत खुलासा झाल्यानंतर मुंबई पोलीस तिसऱ्यांदा पश्चिम चंपारण्य स्थित गौनाहाच्या मसही गावात पोहोचले आहे.
हे ही वाचा - सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर
अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन केलेल्या कारवाईमुळे परिसरात दहशत पसरली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांनी दोन शूटरसह आठ जणांना अटक केली आहे. मसही गावात ज्या लोकांना अटक करण्यात आली, त्यांची नावं दोन्ही आरोपींशी जोडली गेलेली आहे. मात्र मुंबई पोलिसांची कारवाई सांगून बेतिया पोलीस काहीही माहिती देणं टाळत आहेत. मात्र न्यूज 18 हिंदीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान एक मोठ्या गटाचा खुलासा होऊ शकतो, ज्याचं कनेक्शन बिहारमधील चंपारणशी जोडले गेलेलं आहे.