Sangli Crime: स्क्रिनगार्ड अन् फक्त 50 रुपयाचा वाद, सपासप वार करुन तरुणाला संपवलं; सांगलीत खळबळ

जाहिरात
Read Time: 2 mins

सांगली: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भयंकर हत्यांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये पतीने अल्पवयीन मुलासमोरच पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच सांगलीमध्ये अवघ्या 50 रुपयांसाठी तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीमध्ये निर्घृण खून करण्यात आला आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे. शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपी मध्ये हा हत्येचा भयंकर  प्रकार घडला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Walmik Karad: वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?

नेमकं काय घडलं? 

विपुल गोस्वामी याच्या मोबाईल शॉपीमध्ये काही तरुण मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी विपुल याने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये इतकी सांगितली, त्यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीन गार्ड असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली, या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले.

अचानक झालेल्या या हल्ल्यामध्ये विपुल गंभीर जखमी झाला ज्यामध्ये त्याचा जागेच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात देखील घेतला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट