Sangli News: आईने केली 2 लेकरांची 20-20 हजारात विक्री, तिसऱ्या मुलीचा ही होता प्रश्न, पण पुढे जे घडलं ते...

या महिलेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिने आपण या आधी दोन मुलांना दत्तक दिले असल्याचं सांगितलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सांगलीच्या मिरज येथील एका महिलेने दोन मुलांना प्रत्येकी वीस हजार रुपयांना विकले होते
  • तिसरी मुलगी जन्माला आली पण ती पाच दिवसांची असताना आईने जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे नेले
  • मुलांची विक्री बेकायदेशीर पद्धतीने झाली, दत्तक प्रक्रियेची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात आली नव्हती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सांगली:

शरद सातपुते 

पोटच्या लेकरांना आईनेच विकलं. एक नाही तर दोन मुलांची विक्री केली. त्या बदल्यात वीस वीस हजार रुपये ही घेतली. तिसरी मुलगी झाली. पाच दिवसांची ही चिमुकली ही तिला नकोशी झाली होती. पण त्याच वेळी एका घटनेनं विक्री होण्यापासून ही चिमुकली वाटली अन् या सर्व धक्कादायक गोष्टीचा उलगडा झाला. ही घटना सांगलीच्या मिरजमध्ये घडला. विशेष म्हणजे हे सर्व करण्यामागे सांगली महापालिकेत काम करणारी एक महिलाच होती हे ही आता उघड झाले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला आहे. 

मिरज येथील एका महिलेने प्रत्येकी 20 हजार रुपयांना आपल्या दोन मुलांना विकले होते. त्यासाठी तिला 40 हजार रुपये मिळाले होते. ही विक्री एक वर्षापूर्वी झाली होती. नुकतीच त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला. ती पाच दिवसांची होती. पण परिस्थितीमुळे ही मुलगी तिला नको होती. म्हणून ती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांच्याकडे गेली. मुलीला अनाथ आश्रमात ठेवावे असं ती सांगत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिने आपण या आधी दोन मुलांना दत्तक दिले असल्याचं सांगितलं. 

Advertisement

नक्की वाचा - Shocking News: 'हसू झालं माझं, जीव होता तो माझा', विवाहीतेची हातावर सुसाईट एक नोट अन् प्रश्न अनेक

त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या महिलेने एक वर्षापूर्वी माधवनगर इथल्या संजय गोसावी याला एक मुलगा दत्तक दिला होता. तर दुसरा मुलगा दशरत लोंढे कोल्हापूर यांना दिला होता. यांच्याकडून प्रत्येकी वीस हजार रूपये घेण्यात आले होते. जरी ही मुलं दत्तक दिल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्यासाठी कोणती ही कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्यात आली नव्हती हे ही समोर आलं आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रीया बेकायदेशिर पणे राबवली गेली. हा एक गुन्हा आहे हे  जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना त्या महिले समोर स्पष्ट केले. शिवाय याची तक्रार ही पोलीसात दिली. 

नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रक्रीयत सांगली महापालिकेत आरोग्य विभागात काम करणारी महिला मध्यस्ती होती. तिच्या मध्यस्तीनेच या मुलांची विक्री केली गेली होती. सुरेखा लोंढे असं या महिलेचे नाव आहे. ती महापालिकेत अटेंड म्हणून काम करत होती. शिवाय उमाजी लोंढे हा ही यात मध्यस्थीचे काम करत होता. याप्रकरणी बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या चौघाविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी दिली. शिवाय मुलांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

Topics mentioned in this article