जाहिरात

Shocking News: 'हसू झालं माझं, जीव होता तो माझा', विवाहीतेची हातावर सुसाईट नोट एक अन् प्रश्न अनेक

पायलने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न ही निर्माण होत आहेत.

Shocking News: 'हसू झालं माझं, जीव होता तो माझा', विवाहीतेची हातावर सुसाईट नोट एक अन् प्रश्न अनेक
  • सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पायल शशिकांत रणदिवेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
  • पायलचा नवरा आणि सासर्‍यावर तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे
  • पायलच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सोलापूर:

संकेत कुलकर्णी 

लग्नानंतर होणारा सासूरवास आजही अनेक महिलांच्या नशिबी आहे. त्यांचा होणार छळ किंवा अवहेलना थांबलेली नाही. अशा स्थिती अनेक महिला या सर्व काही सहन करून संसाराचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतात. तर काही महिलांना या जाच, त्रास, छळ असह्य होतो. त्यामुळे त्या टोकाचं पाऊल उचलतात. आपलं आयुष्य संपवून घेतात. पण मागे अनेक प्रश्न राहून जातात. अशीच एक गंभीर आणि तेवढीच धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस इथं घडली आहे.  

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील खुळेवाडीमध्ये पायल शशिकांत रणदिवे ही विवाहीत महिला राहात होती. शशिकांत रणदिवे यांच्यासोबत तिने लग्न केले होते. तिने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे पायलचा नवरा आणि सासू सासर्‍याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आहे. या तक्रारीवरून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या आत्महत्या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला ज्यावेळी पायलच्या हातावर तिची सुसाईड नोट सापडली. 

नक्की वाचा - Trending News: 5 दिवसात 4 राज्य फिरला, ब्रिटीश युट्यूबर भारताबाबत थेट बोलला, म्हणाला खरा चेहरा...

पायलने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमुळे अनेक प्रश्न ही निर्माण होत आहेत. ती लिहीते की हसू झालं गं माझं. माझं पार्लर बंद केलं. जीव होता तो माझा. स्वप्न होतं गं. आज पर्यंत शांत बसले. पण आता नाही. चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी माफी मागते. सॉरी अशी सुसाईड नोट तिच्या हातावर आहे. या थेट तिने कोणाला ही ब्लेम केला नाही. पण तिचा रोख तिच्या सासरच्या लोकांकडे आहे असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.      

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

पायलला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. शिवाय तिच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. याबाबत नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचे शव नातेपुते पोलीस ठाण्यात आणले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतरच तिच्या माहेरच्यांनी तिचे प्रेत घरी नेले आहे. याबाबत पायलच्या माहेरच्या व्यक्तींकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. 

नक्की वाचा - राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात ट्विस्ट, अमिताभ बच्चन यांच्या कनेक्शनने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com