- संगीतकार पलाश मुच्छल विरोधात विज्ञान माने यांनी सांगली पोलिसांकडे आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे
- पलाशने विज्ञान माने याला आपली बदनामी केल्याचा आरोप करत १० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे
- विज्ञान माने यांनी नोटीसला चोराच्या उलटा बोंबा असं म्हटलं आहे
शरद सातपुते
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सोबत लग्न तुटल्यामुळे पलाश मुच्छल हा चर्चेत आला होता. मात्र आता तो पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. स्मृतीचा लहानपणीचा मित्र विज्ञान माने यांने पलाशवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्याला पलाशने ही कायदेशीर उत्तर दिले आहेत. त्याने विज्ञानला 10 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असल्याचं विज्ञाने सांगितलं. शिवाय आपण तक्रार मागे घ्यावी यासाठी अंडरवर्ल्डकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप विज्ञानने करून खळबळ उडवून दिली आहे.
संगीतकार पलाश मुच्छल विरोधात स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पलाश मुच्छलकडून विज्ञान माने याला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. आपली बदनामी केल्याचा आरोप पलाशने केला आहे. शिवाय त्याने 10 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. यावर विज्ञानने ही आपली भूमीका मांडली आहे. आपल्याला पाठवण्यात आलेले नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या नोटीसला उत्तर देणार असल्याचं ही विज्ञान मानेनं स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा - Dharashiv News: शिंदेंची शिवसेना भाजपच्या आमदाराने केली हायजॅक? ‘ऑडिओ बॉम्ब' ने खळबळ
पलाश मुच्छल कडून तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यासाठी अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात आहे. त्या मागे पलाश मुछल असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एका चित्रपट निर्मितीसाठी आपण 40 लाख रूपये पलाशला दिले होते असा दावा विज्ञानचा आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहणार आहे असं ही त्याने सांगितले. मात्र पलाश मुच्छल कडून जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावं,अशी मागणी देखील माने यांनी केली आहे.
पलाश विरोधात सांगली येथील विज्ञान माने या तरुणाने आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक याच्यांकडे केली होती. सांगली मधील विज्ञान माने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिंगचं काम करणाऱ्या तरुणाने संगीतकार पलाश मुच्छल विरोधात एकूण 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. नजरिया' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाचा प्रोड्युसर म्हणुन त्यामध्ये गुंतवणूक करावी,असं आमिष पलाशने दाखव्याचा आरोप करण्यात आला आहे. तसच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून 25 लाख गुंतवणुकीवर 12 लाख रुपयापर्यंत मोबदला मिळणार असल्याचंही पलाशने विज्ञान मानेला सांगितलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world