शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli News : महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदा निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन, 7 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल लागेल. त्यामुळे सर्वच पक्षांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सांगलीतील विटा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदाशिव पाटील यांच्या घरासमोर काय घडलं?
ऐन निवडणूकीत विटा येथे माजी आमदार आणि भाजपचे नेते सदाशिव पाटील यांच्या घरासमोर करणी भानामतीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी आमदार सदाशिव पाटील आणि भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर करणीचं साहित्य फेकण्यात आलं. भानामतीच्या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी बंगाली भोंदूसह एका स्थानिकाला पकडलं. यानंतर गावकऱ्यांनी त्या दोघांनाही चोप दिला.
नक्की वाचा - Pune News : पुणे महापालिकेला कधी मिळणार महापौर? 'या' तारखेला 165 नगरसेवकांची विशेष बैठक, कोण कोण आहे शर्यतीत?
भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्यासह नागरिकांनी भोंदू बंगाली बाबासह स्थानिक व्यक्तीची धिंड काढत त्या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत करण्यात आलेल्या काळ्या जादूच्या प्रकारामुळे विटा शहरात खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world