Walmik Karad : राजकारण तापलं! तुरुंगात वाल्मिक कराडला मटण? कधी काय काय दिलं, संपूर्ण यादीच आली समोर   

वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रिटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

स्वानंद पाटील, प्रतिनिधी

VIP Treatment for Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने उलटले तरी अद्याप आरोपी पकडण्यात आलेलं नाही. संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. याच प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला तुरुंगात VIP ट्रिटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे. पण तुरुंगात असतानाही वाल्मिकच्या दिमतीला पोलीस अधिकारी असल्याचं म्हटलं जातंय. तुरुंगातील पोलीस कर्मचारी बक्सर मुलाणी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे, विश्वानाथ गीते, गोविंद खाडे, राहुल राठोड हे वाल्मिक कराडच्या दिमतीला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वाल्मिक कराडला तुरुंगात कुणी काय मदत केली? याची तारीखवार यादीच समोर आली आहे. 

  • 14 जानेवारीला वाल्मिक कराड कारागृहात आल्यानंतर ड्युटीवर नसणारे वैजनाथ मुंडे, रमेश खाडे हे अधिकारी आरोपीसोबत कारागृहात गेले आणि याची नोंदही केली नाही
  • 14 जानेवारीलाच ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोड हे अधिकारी आरोपीचं साहित्य घेऊन गेले आणि साहित्याचा पुरवठा केला
  • 15 जानेवारी सकाळी 8 ते 9 दरम्यान कराडला स्पेशल चहा कोठडीत नेऊन दिला
  • 15 जानेवारीलाच सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे, राहुल राठोडांनी साहित्य दिलं
  • 22 जानेवारीला वाल्मिक कराड पोलीस कोठडीतून परतल्यानंतर कर्मचारी अशोक सानप यांनी त्याची आणि साहित्याची झाडाझडती घेतली नाही
  • 22 जानेवारीला रात्री 11.40 मिनिटांनी कराडला दवाखान्यात नेताना ड्युटीवर नसताना कृष्णा ढाकणे, राहुल राठोडने त्याचं सामान घेऊन नातेवाईकांकडे दिलं
  • 17 फेब्रुवारीला कराडचं वकीलपत्र पेटीमध्ये न घेता ज्ञानेश्वर डोईफोडे यांनी कृष्णा ढाकणेंच्या मार्फत कराडला दिलं
  • 18 फेब्रुवारीला मुलाखतीसाठी कराडला कार्यालयात बोलावून स्पेशल चहा, जेवण दिलं आणि भेटीसाठी 1 तास नियमबाह्य सवलत दिली
  • 15 फेब्रुवारीला सुभेदार चिंचाणे यांनी स्पेशल चहा बनवून कोठडीत नेऊन दिला

Advertisement

नक्की वाचा - Swargate Rape case : आरोपीच्या मुसक्या आवळल्या, एक लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

कारागृहातील हजेरी मास्तर ज्ञानेश्वर डोईफोडे हे कराडच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार लावत असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेचं त्यांच्या नातेवाईकांसोबत ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, गोविंद खाडे हे वारंवार बोलणं करून देतात. देशमुख कुटुंबीयांनी ही माहिती देत कर्मचारी कृष्णा ढाकणे, ज्ञानेश्वर डोईफोडे, गोविंद खाडे, बक्सर मुलाणी, चिंचाणे यांचे कॉल रिकॉर्डही तपासावेत अशीही मागणी केली आहे. तसंच कारागृहातले सगळे सीसीटीव्ही फुटेजही समोर आणावेत अशीही मागणी केली आहे. सुरेश धस यांनी देखील वाल्मिक कराडला मटण मिळत असल्याचा आरोप केला होता. वाल्मिक कराडची व्हीआयपी ट्रीटमेंट ही पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वाल्मिक कराडच्या होत असणाऱ्या बडदास्तावरून विरोधकांनीही निशाणा साधला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या आरोपानंतर सरकारनं पुन्हा एकदा कारवाई करू अशी भूमिका घेतलीय.

Advertisement