जाहिरात

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले...

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे पहिल्यांदाच समोर आले, मारेकऱ्याबद्दल म्हणाले...
मुंबई:

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. विधीमंडळातही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही या प्रकरणात आरोप झाले आहेत. या सर्व विषयावर मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले मुंडे?

आरोपांशी माझं नाव जोडणं, तसे आरोप करणे हे या सदनामध्ये अनेकदा अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. पोलीस तपास करणार आहेत. पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे. आता त्यांनी ही केस पण CID कडं दिली आहे. या सर्व गोष्टीतील 'दूध का दूध, पानी का पानी निघणार आहे.' 

वाल्मिक कराड नागपूरमध्येच लपून बसला आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यावरही दानवे यांच्या आरोपांनाही मुंडेंनी उत्तर दिलंय. 'विरोधी पक्षनेत्यांनी काय बोलावं हे मला सांगता येत नाही. त्यांनी वाल्मिक कराड नागपूरमध्ये कुठं आहे हे सांगितलं असतं तर ते देखील काम पोलिसांनी केलं असतं त्यांना अटक केली असती. या घटनेमध्ये ज्या कुणी आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं.

( नक्की वाचा : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं एन्काऊंटर केला तर 51 लाखाचं बक्षीस अन्... )
 

दोषींवर कारवाई होणार...

दरम्यान या प्रकरणात कोणीही मास्टरमाईंड असला तरी त्यावर कारवाई होईल, अशी घोषणा मुख्यमंक्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वाल्मिक कराडचे नाव घेऊन सांगतो तो कोणाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे कोणासोबत फोटो आहेत, याचा विचार न करता कारवाई होईल. कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे. यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल. या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांनाही संघटित गुन्ह्यामध्ये टाकले जाईल. बीड जिल्ह्यामध्ये एक मोहिम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )
 

आयजी लेव्हल अधिकारी अंतर्गत एसआयटी चौकशी केली जाईल. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही केली जाईल. तीन ते सहा महिन्यात याप्रकरणाची चौकशी होईल. तसेच बीडच्या एसपींची बदली करण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com