सुजित आंबेकर, प्रतिनिधी
लोकशाही व्यवस्थेतील सर्वात भक्कम व दृढ विश्वासू न्यायव्यवस्थेलाच साताऱ्यातील न्यायाधीश लाच प्रकरणाने सुरुंग लावला आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन देण्यासाठी मध्यस्थीमार्फत पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
नक्की वाचा - Pune Crime News: 100 रुपयांची केला घात, लाडकी दांडक्याने मारहाण करत एकाची हत्या
त्यानंतर या प्रकरणातील चारही संशयित आरोपी फरार झाले होते. दरम्यान यातील न्यायमूर्ती धनंजय निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. यामुळे त्यांना चांगलाच दणका बसला होता. दरम्यान या प्रकरणात फरार असलेले मुख्य संशयित आरोपी आनंद मोहन खरात व किशोर संभाजी खरात स्वतःहून न्यायालयाच्या स्वाधीन झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणीत आली आहे. यातील इतर दोन संशयित आरोपी मात्र फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. साताऱ्यात घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण राज्याचे चांगलेच लक्ष वेधले होते.