Satara News: वडापाव खाण्यासाठी मित्र बाहेर पडले, वाटेत त्यांच्या बरोबर भयंकर घडले

तिथे गेल्यानंतर दोघांनी गरमागरम वडापाववर ताव मारला. त्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

एक अशी घटना साताऱ्यात घडली आहे ज्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकचीच दहावीची परिक्षा संपली आहे. परिक्षा संपल्यानंतर दोघे जिवलग मित्र बाहेर वडापाव खाण्यासाठी काय पडले, त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे या तरुणांच्या घरच्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. ही घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. वडापाव खाण्यासाठी हे मित्र सज्जनगडावर गेले होते. त्याच वेळी ही दुर्घटना घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत हे दोघेही दहावीचे विद्यार्थी आहेत. त्यांची दहावीची परिक्षा नुकतीच संपली. ते सज्जन गडा जवळच्या आंबोडे बुद्रूक यागावचे रहिवाशी आहे. सुट्टी सुरू झाली होती. त्यात दोघांनाही वडापाव खाण्याची इच्छा झाली. जवळच असलेल्या सज्जनगडावरील फेमस वडापाव खाऊ असं दोघांनी ही ठरवलं. त्यानुसार ते सज्जनगडावर गेले. जाताना त्यांनी एका व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. त्याच्या बरोबरच ते सज्जनगडावर पोहोचले. 

ट्रेंडिंग बातमी - CM Devendra Fadnavis : 'राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका

तिथे गेल्यानंतर दोघांनी गरमागरम वडापाववर ताव मारला. त्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. दोघे ही चालत चालत गावाच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना एक बाईक दिसली. त्यांनी त्याच्याकडे गावापर्यंत लिफ्ट मागितली. त्यानंतर ते दोघे ही त्या बाईकवर बसले. बाईक घाटवळणातून जात होती. दुचाकी पुढे जोरात चालली होती. घाटातून अन्य वाहाने ही जात होती. त्याच वेळी त्यांच्या मागे एक गाडी येत होती. 

ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime : केळीचं पान ठरलं कारण; पत्नी आणि मुलासमाेरच वयोवृद्ध व्यावसायिकाची कात्रीने भोसकून हत्या

त्या गाडीने मागून दुचाकीला जोरदार ठोकर दिली. दुचाकीला पिकप गाडीने दिलेल्या या धडकेत ते तिघे ही खाली पडले. यात दोन जिवलग मित्र असलेल्या मुलांचा जागीच मृत्यू झाला.वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही सज्जनगडापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या  आंबोडे बुद्रूक गावातील होते. गावाजवळ पोहोचत असतानाच त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.  

Advertisement