
Chief Minister Devendra Fadnavis : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यांना राज्याला सूचना देत पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्याची सूचना दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले असून राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अलर्ट दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे महापालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने पुणे अर्बन डायलॉगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय. काश्मीर प्रकरणावर उलट-सुलट बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाहीत, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Sharad pawar: 'महिलांना त्यांनी सोडलं, हिंदू म्हणून मारलं याबाबत माहित नाही' पवारांच्या वक्तव्याने...
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचं मोठं ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत दहा दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आली. स्थानिक दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून गेल्या 6 दिवसांत 10 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
या दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
• आदिल हुसेन ठोकर, अनंतनाग (लष्कर-ए-तैयबा)
• आसिफ शेख, त्राल (लष्कर-ए-तैयबा)
• शाहिद अहमद कुट्टे, शोपियां
• जाकीर अहमद गनई, कुलगाम (लष्कर)
• अहसान उल हक, पुलवामा
• आमिर नज़ीर वानी, अवंतीपोरा (जैश-ए-मोहम्मद)
• जमील अहमद शेर गोजरी, बांदीपोरा (२०१६ पासून सक्रिय)
• आमिर अहमद डार, शोपियां (लष्कर-ए-तैयबा)
• अदनान साफी डार, जैनपोरा (टीआरएफ)
• फारूक अहमद तेडवा, कुपवाडा*
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world