जाहिरात

Kalyan Crime : केळीचं पान ठरलं कारण; पत्नी आणि मुलासमाेरच वयोवृद्ध व्यावसायिकाची कात्रीने भोसकून हत्या

दिवसाढवळ्या शेकडो लोकांसमोर कल्याणमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime : केळीचं पान ठरलं कारण; पत्नी आणि मुलासमाेरच वयोवृद्ध व्यावसायिकाची कात्रीने भोसकून हत्या

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan Crime : केळीच्या पानावरुन झालेल्या वादात कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात व्यावसायिकाचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला अटक केली आहे. मात्र दिवसाढवळ्या शेकडो लोकांसमोर घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिमनलाल कालरा आणि त्याचा मुलगा कार्तीक कालरा हे केळीची पाने विकण्याचा व्यवयास करतात. या बाजारात चिराग साेनी नावाचा तरुण देखील केळीच्या पानाचा व्यवसाय करतो. रविवारी सकाळी केळीची पाने एका ट्रकमधून बाजारात आणले गेले. केळीची पाने चिराग सोनी याला पाहिजे होती. मात्र चिमनलाल कालरा यांनी केळीची पाने खरेदी केली.

Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!

नक्की वाचा - Jalgaon Crime : विवाह कार्यालयात बापाने मुलगी आणि जावयावर झाडल्या गोळ्या; जळगाव हादरलं!

यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर चिमनलाल कालरा यांनी चिराग सोनी याची तक्रार करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात जात असताना चिराण सोनी याने धारधार कैची घेऊन चिमनलाल कालरा यांच्या दिशेने आला. त्याने कैचीने चिमनलालवर सपासपवार केले. त्यांचा मुलगा कार्तिक मध्यस्थी करण्यासाठी आला त्यालाही त्याने जखमी केले. चिमनलाल जागीच ठार झाले. तर मुलगा कार्तीक गंभीर जखमी झाला. चिमनलाल यांची पत्नी देखील त्याठिकाणी पोहचली. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला लगेच अटक केली. चिरागण सोनीच्या विरोधात या आधीही गुन्हे दाखल आहेत. हल्ल्याच्या वेळी चिराग हा नशेत होता. बाजार समितीच्या आवारात नशेचा वापर जोरात सुरू आहे. या बाजारात जे वाद हाेतात ते नशेबाज करतात. मात्र एका व्यावसायिकाची दिवसाढवळ्या हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: