जाहिरात

Sathaye College Student Death: संध्या पाठक मृत्यू प्रकरणाचं सत्य समजणार? पोलिसांना सापडला मोठा पुरावा!

Sathaye College Student Death: संध्या पाठक मृत्यू प्रकरणाचं सत्य समजणार? पोलिसांना सापडला मोठा पुरावा!
मुंबई:

पारस दामा, प्रतिनिधी

Sathaye College Student Death : मुंबईतल्या विले पार्लेमधील प्रसिद्ध साठ्ये महाविद्यालयात संध्या पाठक या विद्यार्थीनीचा मृतदेह गुरुवारी (19 जून) सापडला होता. संध्यानं आत्महत्या केली असावी असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संध्याच्या कुटुंबीयांनी संध्या (Sandhya Pathak) आत्महत्या करुच शकत नाही, असा दावा केला. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती. संध्याच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे पुरावा?

संध्याने आत्महत्याच केली असावी असा पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संध्यानं मृत्यूपूर्वी एक मेसेज पाठवला होता. ज्यात तिने मै आत्महत्या कर लुंगी' असं लिहिले होते. त्याचबरोबर संध्याच्या बॅगेमध्ये मानसिक उपचारासाठीच्या औषधे सापडली असल्याचीही माहिती देखील पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संध्या मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

संध्यावर कोणताही दबाव नव्हता. तर ती आत्महत्या का करेल? तिला आत्महत्या करायचीच असेल तर र तिने घरीच स्वत:चं बरं वाईट केलं असतं किंवा ट्रेनमधून उडी मारली असती. ती कॉलेजमध्ये जाऊन असं का करेल..? असे अनेक प्रश्न तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केले होते. संध्याला कुणीतरी धक्का दिला असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. 

( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
 

यापूर्वी साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की,  संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली. सदर घटनेचा आवाज आल्याने महाविद्यालयात उपस्थिती असलेल्या गावडे कर्मचारी आणि दोन विद्यार्थी यांनी स्थळी मदतसाठी धाव घेतली आणि सदर विद्यार्थिनीला महाविद्यालया नजीक असणाऱ्या गावडे हॉस्पिटलमध्ये तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचाराच्या दरम्यान हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com