अकोल्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सर्व घरांमध्ये कुलरच्या वापरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोगे कुटुंबाने आपल्या सात वर्षांच्या लेकीला गमावलं आहे. एका छोट्याशा गोष्टीमुळे सात वर्षांच्या लेकीचा जीव गेल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर प्रत्येकाने घरात वावरताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अकोल्यात कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीला जीव गमवावा लागलाय. घरात लावलेल्या कुलरजवळ खेळत असताना या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
युक्ती अमोल गोगे असं मृत पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे. काल रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षांची मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. आणि कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्तीचे आईवडील व कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान कुलरला असलेल्या बटनांची एक वायर तुटली गेली होती आणि त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता आणि त्यातून ही दुर्घटना घडली.
नक्की वाचा - नाशिकच्या ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर PPE किट घालून दरोडा, 5 कोटींचे दागिने लंपास
काही दिवसांपूर्वीचं कुलरमूळ पोलिसाचा दुर्दैवी मृत्यु
काही दिवसांपूर्वीचं पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने (57, रा. अंबिका नगर, मलकापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा कूलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याची अकोल्यातील ही दूसरी घटना आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world