जाहिरात

Shirdi News : वाढदिवसासाठी खून ! 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करून केली पार्टी..!

Shirdi Crime News : वाढदिवसाच्या पार्टीचे पैसे हवेत म्हणून 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली आहे.

Shirdi News : वाढदिवसासाठी खून ! 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करून केली पार्टी..!
Shirdi News : अल्पवयीन मुलांनी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ही हत्या केली. (प्रतिकात्मक फोटो)
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

वाढदिवस म्हंटलं की पार्टी आली... ती पार्टी साधी नाही तर दणक्यात करायची हे फॅड आता शहरांमध्ये सुरु झालं. त्याचं लोण आता निमशहरी आणि ग्रामीण भागातही पसरलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे पैसे हवेत म्हणून 7 अल्पवयीन मुलांनी 42 वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली आहे. साईबाबांच्या शिर्डी परिसरात ही घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथिल रहीवाशी गणेश चत्तर हे 8 जून रोजी संध्याकाळी बाहेर गेले होते. घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पण काहीच माहिती मिळाली नाही. काही दिवसांनी, शिर्डीच्या नांदुर्खी बुद्रुक गावाजवळील एका उसाच्या शेतात एक अज्ञात मृतदेह आढळून आला. शिर्डी  पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

13 जून रोजी आलेल्या वैद्यकीय अहवालात मृताच्या पाठीवर धारदार शस्त्राचे घाव असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक सविस्तर केला. विशेषतः मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे  मृताचे ओळख पटली. तो मृतदेह गणेश चत्तर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

( नक्की वाचा : पत्नीने कुऱ्हाडीनं वार करत केली पतीची हत्या, 2 महिने लपवला मृतदेह! )
 

कसा लागला छडा?

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या हत्येचं कारण तपासण्यास सुरुवात केली. त्यांनी गणेश यांचा मोबाईल क्रमांक ट्रॅक केला. त्यावेळी तो मोबाईल एका दुकानदाराकडे वापरात असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत कळले की तो मोबाईल एका अल्पवयीन मुलाने साडेचार हजार रुपयांना विकला होता. त्या पैशातून या सात मुलांनी वाढदिवसाची पार्टी केली होती.

ही माहिती मिळतात पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी अल्पयीन आहेत.  त्यांनी वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गणेश यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल साडेचार हजारांना विकल्याची कबुली दिली. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com