- अविनाश पवार, प्रतिनिधी
Shirur News: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुत्यामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलीय. चहाच्या टपरीवर बसलेल्या एका तरुणाला काही जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी आणि दांडक्याने जबर मारहाण केली. क्षुल्लक कारणावरुन टोळक्याने या तरुणावर हल्ला केला. केवळ एका इन्स्टाग्राम फ्रेंड रीक्वेस्टमुळे इतका भयंकर प्रकार घडल्याची माहिती समोर आली.
टोळक्याने तरुणाला का केली मारहाण?
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर फ्रेंड रीक्वेस्ट स्वीकारली नाही, या कारणावरुन काही तरुणांनी मिळून रोहन खामकर (वय 21 वर्षे) नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली. रोहन खामकर हा वेल्डिंग कामगार आहे. या प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
चार जणांविरोधात गुन्हा दाखल
रोहन खामकर (वय 21 वर्षे) हा वेल्डिंगचे काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. इन्स्टाग्राम फ्रेंड रीक्वेस्टमुळे झालेल्या या वादातून अमर मुंजाळ, हर्षद खाडे, करण चव्हाण आणि सचिन पवार चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी चौघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस पुढील तपासही करत आहेत.
(नक्की वाचा: Dombivli News : 'मी लग्न करतो' म्हणाला... अन् रुग्णाची पत्नी फसली, प्रसिद्ध डॉक्टरच्या कृत्यानं डोंबिवलीत खळबळ)
दरम्यान सोशल मीडियावरील किरकोळ कारणांवरून तरुणांमध्ये भयंकर प्रकारचे वाद होण्याचे प्रमाण वाढत चाललंय. वाढणारी हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे. या सर्व गोष्टींवर वेळीच नियंत्रण येणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Akola News : पती-पत्नी आणि 'ती'च्या वादामुळे एका आईचा जीव गेला! 14 वर्षांचा मुलगा पोरका; अकोल्यात खळबळ)