पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ताजं असताना शिरूर तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ताजं असताना शिरूर तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मालवाहू पिकअप चालविणाऱ्या पोलीस पाटलाच्या 15 वर्षीय मुलीने दुचाकीला धडक दिल्याने 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे आणि त्यातून होणाऱ्या अपघात सत्रामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील प्रकरणानंतर आता शिरूर अपघात प्रकरणातही अल्पवयीन मुलीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असताना शिरुर तालुक्यातील एका अल्पवयीन पोलीस पाटलाच्या 15 वर्षीय मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार दुचाकी चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेलं. या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला आहे.

नक्की वाचा - पुणे पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी केला घृणास्पद प्रकार

अरणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी पिकअप क्रमांक एम एच 12 एस एफ 3439 चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. यावेळी मुलगी पिकअप जोरात भरधाव वेगात चालवित होती. यावेळी दुचाकीला समोरुन धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या प्रकरणी शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.