एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा खाजगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री 24 वर्षाची असून तिने आपली एक वेगळी ओळख अभिनय क्षेत्रात निर्माण केली आहे. तिचा ही व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ जवळपास 14 मिनीटांचा आहे. तो ट्वीटरसह अनेक सोशल मीडिया साईडवर व्हायरल झाला आहे. मात्र त्या व्हिडीओच्या सत्यते बाबत कुणीही हमी दिलेली नाही. हा प्रकार कास्टिंग काउचा असू शकतो असा संशय ही काही जणांनी व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अभिनेत्रीचे नाव श्रुती नारायणन आहे. ती एक प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे. तिच्या 14 मिनीटांच्या खाजगी व्हिडीओने सोशल माडियावर खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ नक्की कधी काढला गेला याबाबत कुणीही पुष्टी केलेली नाही. एका ऑडीशन दरम्यान हा रेकॉर्ड केला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय हा कास्टिंग काउचचा प्रकार असावा अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर तो एक्स, इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या टेलीग्रामसारख्या साईडवर दिसून येत आहेत. शिवाय तो शेअर ही केला जात आहे. त्यामुळे तो वाऱ्या सारखा व्हायर झाला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रीयांचा पाऊस पडत आहे. तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच सारखे प्रकार होत आहेत. ते या निमित्ताने बाहेर येत आहेत. त्यावर कारवाई झाली पाहीजे असे काहींचे म्हणणे आहे. तर हा व्हिडीओ डीप फेक असू शकतो असं ही काहींनी म्हटलं आहे. तर काही वर्षां पूर्वी त्रिशा कृष्णन आणि आमला पॉल यांच्या बरोबर ही अशीच घटना घडली होती. त्याबरोबर काहींनी तुलना केली आहे. सध्या ट्विटरवर #shruthinarayananalaeked ट्रेंड देखील केले जात असल्याचं समोर आलं आहे. ज्यावर दोन लाखा पेक्षा जास्त पोस्ट दिसत आहेत.
श्रुती नारायण ही दक्षिणेतली मोठी अभिनेत्री आहे. तिने थोड्या कालावधीतच चांगले नाव कमवले आहे. तामिळनाडूतील 'सिरागादिर आसा'या टीव्ही शोने तीला खरी ओळख दिली. त्यामुळे ती घराघरात पोहोचली. इंस्टाग्रामवरही तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोव्हर्स आहेत. तिच्या अभिनयाच्या पोस्ट ती त्यावर नेहमी करत असते. दरम्यान जो 14 मिनिटांचा व्हिडीओ लिक झाला आहे त्याची सत्यता कुणीही पडताळून पाहीलेली नाही. सध्या तो व्हिडीओ काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.