- लोकलमधील बनावट तिकीट आणि पास वापरण्याऱ्यां विरोधात रेल्वे प्रशासनाने कडक पाऊल.
- एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी पाससह ओळखपत्र टीटीईंना दाखवणे अनिवार्य
- बनावट तिकीट तयार करण्यासाठी AI आणि एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर झाल्याचे आढळले.
Local Train New Rule: मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवर (Central and Western Railway) वातानुकूलित (AC) लोकलचे बनावट तिकीट आणि पास वापरण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. आता एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाससोबत ओळखपत्र (ID Card) तिकीट तपासनीसांना (TTEs) दाखवणे बंधनकारक आहे. महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात कठोर सूचना दिल्या आहेत. यूटीएस अॅपवरील (UTS App) ऑनलाइन तिकीट आणि पास ग्राह्य धरावेत आणि ऑफलाइन काढलेल्या पाससोबत ओळखपत्राची तपासणी सक्तीने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बनावट तिकीट प्रकरणांची गंभीर दखल (Serious Note on Fake Ticket Cases)
बनावट तिकीट आणि पासच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी महाव्यवस्थापक गुप्ता यांनी नुकतीच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. AI आणि एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून एसी लोकलचे बनावट पास तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेवर 3 आणि पश्चिम रेल्वेवर 2 अशा एकूण 5 प्रकरणांमध्ये विविध रेल्वे पोलीस ठाण्यात (GRP) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कठोर पावलं उचलण्याचे ठरवले आहे.
कोणते पास वैध नसतील? (Which Passes Will Not Be Valid?)
ऑफलाइन पद्धतीने पास काढताना रेल्वेकडून देण्यात येणारे अधिकृत ओळखपत्र वापरले जाते. त्यामुळे आता सर्व तिकीट तपासनीसांनी पाससह प्रवाशांच्या ओळखपत्राची तपासणी करणे अनिवार्य आहे. केवळ भारतीय रेल्वेच्या अधिकृत यूटीएस अॅपमध्ये दिसणारे तिकीट आणि पास हेच ऑनलाइन वैध मानले जातील. अन्य कोणत्याही माध्यमांमध्ये दाखवण्यात आलेले ऑनलाइन पास ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना टीसींना देण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान तिकीट असूनही ओळखपत्र दाखवता न आल्यास, दंड आकारला जाईल.
सात वर्षांपर्यंत तुरुंगवास (Up to Seven Years Imprisonment)
रेल्वे कायद्यानुसार, विनातिकीट प्रवासासाठी 500 रुपये दंड आकारला जातो. मात्र, बनावट तिकीट वापरणे हा रेल्वेची फसवणूक (Cheating) करण्याचा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार कमाल 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दाखल गुन्ह्यांची कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापक गुप्ता यांनी दिले आहेत.
अलीकडील घटना (Recent Incidents)
डिसेंबर 2025 च्या सुरुवातीला सेंट्रल स्टेशनवर 3 प्रवासी एआय जनरेटेड (AI generated) बनावट यूटीएस पाससह पकडले गेले. तसेच, कल्याण स्टेशनवर एका महिला सेल्स मॅनेजरला क्यूआर कोड नसलेला नकली पास वापरल्याबद्दल आणि दुसऱ्या घटनेत एका सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेला यूटीएसद्वारे बनावट तिकीट वापरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world