जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर एक सुरुंग करणाऱ्या ठिकाणी दहशतवादी (Ganderbal terror attack ) हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा मजुरांचा मृत्यू झाला. या जिल्ह्यातील गुंड भागात सुरुंग परियोजनेवर सायंकाळी उशीरापर्यंत मजूर काम करीत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मजूर जेवण करीत होते. अचानक लाइट गेली आणि मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. येथे दोन दहशतवादी असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्ट्रेंस फ्रंट संघटनेचा हात असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जखमी मजूर आणि डॉक्टरांनी रुग्णालयात जीव सोडला. यातील पाच जखमींवर अद्याप उपचार सुरू आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने परिसरात घेराव घातला आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यावर निषेध व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world