Shocking Video: दबक्या पावलानं आला,महिलांची अंतर्वस्त्रं चोरून गेला, हा असला कसला चोर? पाहा Video

हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • यवतमाळ शहरातील तुळजा नगरी परिसरात एक तरुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
  • चोरी करणाऱ्या तरुणाने वाळत घातलेल्या कपड्यांमधून दोन अंतर्वस्त्रे चोरी करून त्यांचा वास घेतला
  • घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
यवतमाळ:

प्रतिक राठोड 

काही जण विकृतीचा कळस गाठतात. त्यांच्या या विकृतीमुळे समाजालाच धोका निर्माण होतो. अशा अनेक धक्कादायक घटना आपण पाहिल्या आहेत, किंवा त्या समोर आला आहे. कोणाची काय विकृती असेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना यवतमाळ शहरात समोर आली आहे. यात एक तरुण रात्रीच्या सुमारास महिलांची अंतर्वस्त्रे चोरत आहे. त्याची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तो ऐवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांने त्यानंतर केलेली कृती ही जास्त किळसवाणी आहे. ते ही या सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 

यवतमाळ शहरातील तुळजा नगरी परिसरात पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी पहाटे दोन ते साडेचार वाजताच्या दरम्यान एक विकृत तरुण घराच्या आवारात शिरला. तो आवारात शिरताना अगदी दबक्या पावलाने आला होता. तो काही तरी चोरी करणार असं त्यात वाटत आहे. पुढे सरकल्यानंतर तो दोरीवर वाळत टाकलेल्या कपड्यांकडे वळवा. त्याने तिथे थोडी शोधाशोध केली. 

नक्की वाचा - Beed News: दोन बहिणींच्या अपहरणाचा कट, छोट्या बहिणीचं जबरदस्त धाडस, 'असा' उधळला डाव

 त्यानंतर महिलांची दोन अंतर्वस्त्रे त्याच्या हाती लागली. इतर कपडे सोडून त्याने ती अंतर्वस्त्रे आपल्या जवळी घेतली. त्यानंतर त्यांचा वास घेतला. पुढे तीच अंतर्वस्त्रे त्याने आपल्या खिशात टाकली. तिथून नंतर तो निघून गेला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.या तरुणाने घराबाहेर वाळत घातलेली महिलांची दोन अंतर्वस्त्रे चोरल्याचे यात दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नक्की वाचा - Maharashtra Dry Days 2026: होळी, मोहरम, गांधी जयंतीला आता 'ड्राय डे' नाही? NDTV मराठीचा Fact Check

हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित तरुणाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस आता कामाला लागले आहेत. हा तरुणी नक्की कोण आहे? तो असं का करत आहे याचा आता त्यांना तपास घ्यावा लागणार आहे. मात्र या चोराची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. 

Advertisement