जाहिरात

Beed News: दोन बहिणींच्या अपहरणाचा कट, छोट्या बहिणीचं जबरदस्त धाडस, 'असा' उधळला डाव

त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं.

Beed News: दोन बहिणींच्या अपहरणाचा कट, छोट्या बहिणीचं जबरदस्त धाडस, 'असा' उधळला डाव
AI Image
  • बीडच्या माजलगावमध्ये दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा प्रकरण समोर आला आहे
  • अपहरणाचा प्रयत्न करताना लहान बहिणीने धाडस दाखवून जोरदार प्रतिकार केला
  • नागरिकांच्या मदतीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला गेला आणि त्यांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्या सारखेच आहे.  त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या.   

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या दोन बहिणींच्या अपहरणाचा डाव होता. दोन्ही मुली ज्या वेळी त्यांच्या समोर आल्या त्यावेळी या तिघांनी ही त्यांच्यावर झडप टाकली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं. तिने त्यांना प्रतिकार केला. 

नक्की वाचा - Holi News: होळी दरम्यान प्रदोष काळ अन् चंद्रग्रहण ही!, मग सण नेमका कधी साजरा करायचा? वाचा सर्व डिटेल्स

शिवाय जोरजोरात आरडाओरड केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. लहान बहिणीने जबर प्रतिकार आणि आरडाओरडा केला. तो ऐकून तिथं नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना हा प्रकार काही तरी भयंकर असल्याचं जाणवलं. नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला. 

नक्की वाचा - Maharashtra Dry Days 2026: होळी, मोहरम, गांधी जयंतीला आता 'ड्राय डे' नाही? NDTV मराठीचा Fact Check

त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांचे वाहन ही जप्त केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता हे तपासात समोर आले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी माहिती दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com