Siya Goyal : केतन हत्याकांडात क्रॉस मॅरेजचा नवा अँगल; गोयल-अग्रवाल कुटुंबात एक नव्हे दोन लग्नांचा होता प्लान

प्री-वेडिंग शूटमध्ये सीया-केतनसह साहिल आण केतनची बहीण सामील होण्याची तयारी होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Siya Goyal News : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडात क्रॉस मॅरेज म्हणजेच डबल वेडिंगचा नवा अँगल समोर आला आहे. केतन अग्रवालचं लग्न सीया गोयलशी तर केतनच्या बहिणीचं लग्न सीयाचा भाऊ साहिल गोयलसोबत ठरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही कुटुंबातील नातं मजबूत करण्यासाठी ६ जून रोजी बालीमध्ये प्री-वेडिंग शूटचं प्लानिंग करण्यात आलं होतं. प्री-वेडिंग शूटमध्ये सीया-केतनसह साहिल आण केतनची बहीण सामील होण्याची तयारी होती. 

नोव्हेंबर महिन्यात केतन-सीया आणि त्यानंतर साहिल-केतनच्या बहिणीचं लग्न होण्याचा प्लान असल्याचं सांगितलं जात आहे. आता पोलीस साहिल गोयल याच्या भूमिकेवरही तपास सुरू आहे. साहिलला सीया आणि चेतन चौधरीच्या नात्याबाबत आधीच माहिती होती का आणि त्याने ही बाब कुटुंबापासून लपवली होती का, पोलिसांकडून याचा शोध घेतला जात आहे. 

Advertisement

...म्हणून साहिलने आई-वडिलांना सीया-चेतनबद्दल सांगितलं नाही....

एका लोकल न्यूज पोर्टलमध्ये दिलेल्या मुलाखतीत साहिलने दावा केला आहे की, सीयाने त्याला आश्वासन दिलं होतं की तिला फक्त केतनशीच लग्न करायचं आहे आणि चेतनसोबतचं तिचं नातं संपलं आहे. साहिलनुसार, सीयाने शपथ घेऊन सांगितलं होतं की, चेतनसोबत तिचा काहीही संबंध राहिलेला नाही आणि यासाठीच त्याने आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली नाही. 

साहिलने असाही दावा केला आहे की, सीया केतनसोबत लग्नासाठी खूप खूश होती. दोघे प्री-वेडिंग शूटची तयारी करीत होते. तो पुढे म्हणाला, त्याने चेतनला फक्त जुना मित्र असल्याचं मानलं आणि त्याला कोणताही संशय आला नाही. 

नक्की वाचा - Siya Goyal News : केतन वाचला असता तर... सीयाने आखला होता प्लान B; चेतनसोबत लग्नाचीही होती तयारी

अग्रवाल कुटुंबाच्या जवळच्या लोकांनीही क्रॉस मॅरेजचा प्लान असल्याचा दावा केला आहे. पोलीस या प्रकरणात सर्व अँगलने तपास करीत आहे आणि साहिलची भूमिकाही तपासाच्या चौकटीत आली आहे. 

Advertisement

पोलिसांकडून लोहगड किल्ल्यावर रिक्रिएशन

पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी लोहगड किल्ल्यावर संपूर्ण घटनाक्रमाचं रिक्रिएशन केलं. तपासानुसार, पोलिसांनी हत्येची घटना समजून घेण्यासाठी केतन अग्रवालच्या उंचीचा आणि वजनाचा एक फायबर डमी ३०० फुटावरुन खोल दरीत फेकला. 

पोलिसांनी केतन अग्रवाल हत्याकांडाचा जलद गतीने तपास करीत आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सीया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीवर गंभीर आरोप आहेत. तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, दोघांनी मिळून १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनला धक्का देऊन खाली पाडलं, ज्यात त्याचा मृत्यू झाला. 

Advertisement