जाहिरात

Siya Goyal News : केतन वाचला असता तर... सीयाने आखला होता प्लान B; चेतनसोबत लग्नाचीही होती तयारी

Siya Goyal News : चेतन चौधरीने केतनला लोहगड किल्ल्यावरुन धक्का देऊन हत्येचा कट रचला, इतकच नाही तर केतन धक्क्यातून बचावला असता त्यासाठी दुसरा प्लान बीदेखील तयार ठेवला होता. 

Siya Goyal News :  केतन वाचला असता तर... सीयाने आखला होता प्लान B; चेतनसोबत लग्नाचीही होती तयारी

Ketan Aggarwal murder case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस सूत्रांनुसार, मुख्य आरोपी सीया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीने केतनला लोहगड किल्ल्यावरुन धक्का देऊन हत्येचा कट रचला, इतकच नाही तर केतन धक्क्यातून बचावला असता त्यासाठी दुसरा प्लान बीदेखील तयार ठेवला होता. 

पोलीस सूत्रांनुसार, सीयाला कोणत्याही परिस्थितीत केतन अग्रवालशी लग्न करायचं नव्हतं. यासाठी चेतन चौधरीसोबत मिळून तिने अनेक प्लान तयार केले होते. सूत्रांनुसार, केतनची रस्ते अपघातात हत्या करण्याचा किंवा त्याला विष देऊन मारण्याचाही विचार झाला होता. मात्र अशा परिस्थितीत पकडण्याची भीती असते. शेवटी दोघांनी लोहगड किल्ल्यावरुन धक्का देऊन चेतनची हत्या करण्याचा प्लान निश्चित केला. 

लग्न रद्द करण्याचा प्लान B

तपासानुसार, केतनचा दरीत पडून मृत्यू झाला नसता अशा परिस्थितीतही सीयाने नवी रणनीती तयार केली होती. पोलीस सूत्रांनुसार, सीयाला अपेक्षित होतं की, उंचीवरुन पडल्यानंतर केतन गंभीर जखमी होईल आणि कायमचा अपंग होऊ शकतो. अशा स्थितीत या आधारावर लग्न तोडण्याचा निर्णय घेतला असता आणि कुटुंबाला हेच कारण सांगितलं असतं. 

नक्की वाचा - Law Stories : बायको जाड झाली, नॉनव्हेज खात नाही म्हणून घटस्फोटाची मागणी, कोर्टाने मान्य केलं का?

सूत्रांनुसार, सीयाला माहित होतं की, जर तिने थेट चेतन चौधरीशी लग्नाबाबत कुटुंबाला सांगितलं असतं तर ते कधीच तयार झाले नसते. आधी केतनपासून सुटका करून घ्यायची आणि काही वर्षानंतर चेतनशी लग्न करण्याचा तिचा प्लान होता. हत्येपूर्वी दोन्ही आरोपींनी संपूर्ण कट किती विचारपूर्वक तयार केला होता आणि त्यात कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली होती, या दृष्टिकोनातूनही तपास यंत्रणा तपास करत आहेत.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com