- कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर दिल्लीतील आंदोलनात बरखा त्रेहानने शाई फेकली
- बरखा त्रेहानने सोशल मीडियावर आपल्या कृतीचा खुलासा करत ती कट्टर हिंदू असल्याचे स्पष्ट केले
- बरखा त्रेहानने उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि माजी आमदार कुलदीप सेंगर याचे खुले समर्थन केले होते
Barkha Trehan Profile: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर एका महीलेने मंचावर जावून शाई फेकली. या धक्कादायक घटनेनंतर तिथे एकच खळबळ उडाली. शाई फेकणाऱ्या महिलेचे नाव बरखा त्रेहान असे आहे. त्यानतंर ही बरखा नक्की कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ज्या वेळी तिचा भूतकाळ समोर आला ते पाहून सर्वच जण हादरले आहेत. कारण तिचा थेट संबंध एका बलात्कार प्रकरणातील आरोपीचे समर्थन करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
अभिजीत दीपके यांच्यावर याच बरखा त्रेहानने शाई फेकली. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर तिने शाई फेकणारी मीच होती असं सांगितलं आहे. त्यात ती लिहिते की "होय, मी बरखा त्रेहान आहे, जिने त्या कट्टर अर्बन नक्षलवादी अभिजीत दीपकेवर शाई फेकली आहे. कारण त्याच्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या मंचावर माझ्या प्रभू श्री रामाचा अपमान झाला. तो त्यावर हसत होता. मी एक कट्टर हिंदू आहे. हा माझा निषेध होता, ज्याचा मला अभिमान आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेनंतर बरखा त्रेहान बाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. तिने उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे माजी आमदार कुलदीप सेंगर यांचे समर्थन केले होते. गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी जंतर-मंतरवर 'पुरुष आयोग' या स्वयंसेवी संस्थेने (NGO) आयोजित केलेल्या आंदोलनात तिने भाग घेतला होता. ऐवढेच काय तर बलात्काराचा आरोप असलेल्या कुलदीप सेंगर यांच्या बाजूने ती उभी राहिली होती.
बरखा त्रेहान स्वतःला पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्त्या सांगत असते. तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पुरुषांवर झालेल्या अत्याचारांच्या अनेक घटनांची नोंद पाहायला मिळत आहे. ज्यात केतन अग्रवाल आणि राजा रघुवंशी यांसारख्या हाय-प्रोफाइल प्रकरणांचा समावेश आहे. ती अनेकदा विविध टीव्ही न्यूज चॅनेल्सवरील चर्चासत्रात सहभागी झालेली आहे. शिवाय ती माध्यम समूहांसाठी लेखनही करते. या शाई फेक प्रकरणावर तिच्यावर कोणती ही कारवाई करण्यात आली नाही. बरखाला केवळ समज देऊन सोडून दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world