जाहिरात

'मी पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही'; आत्महत्येपूर्वी बापाची हळहळ; लेकीचा रिप्लाय वाचून अंगावर काटा येईल

'शंभर वेळा तुम्हाला फोन केला. तुम्ही घरी या.' बापाचा मेसेज पाहून लेकीची आर्त हाक...

'मी पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही'; आत्महत्येपूर्वी बापाची हळहळ; लेकीचा रिप्लाय वाचून अंगावर काटा येईल

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Solapur News : सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बापाने आपल्या लेकीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ४७ वर्षांच्या बापाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या हताश बापाने मुलीला संदेश देताना आत्महत्येचं कारणही दिलं आहे. 

मी तुझ्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ कर...

सोलापुरातील संभाजी महाराज तलाव परिसरातील रेल्वे पुलावरून उडी घेत संपवलं जीवन. अनिल मारुती नरवडे असं या ४७ वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी अनिल यांनी आपल्या लेकीला मेसेज केला होता. यामध्ये त्याने मी तुझ्या लायकीचा नसल्याचं म्हटलं आहे. अनिल यांना दारु आणि जुगाराचं व्यसन होतं. 

अनिल नरवडे यांना स्वतःच्या कर्जापायी स्वतःची तीस हजार रुपयांची दुचाकी गहाण ठेवावी लागली होती. याच विवंचनेतून आणि स्वतःच्या कृतीच्या पश्चातापातून त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर येत आहे. 'मी तुझ्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ कर. वाईट मार्गाला लागल्यामुळे मी कधी सुधारलो नसतो. कृष्णा, मी माझे सर्व ओझे तुझ्यावर सोडून जात आहे. तू आई आणि भावाचा सांभाळ कर. माझा मार्ग कधीच धरू नकोस. कारण तो कधीच चांगला ठरला नाही' असा व्हॉट्सअपवर मेसेज करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे.

Latest and Breaking News on NDTV

बापासाठी लेकीची आर्त हाक...

वडिलांचा मेसेज पाहून लेकीने त्यांना रिप्लायही केल्याचं समोर आलं आहे. वडिलांचा मेसेज पाहिल्यानंतर ती बाबांना फोन करते. शेवटी मेसेजमध्ये तिने लिहिलंय, शंभर वेळा तुम्हाला फोन केला. तुम्ही घरी या. तुमच्या गाडीबाबत मी तक्रार करते. जर तुम्हाला आमची काळजी असेल तर लवकर घरी या. फोन करा पप्पा... तुम्ही कुठे आहात? 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com