सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरातील एका 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह बाहेर काढताना मोठा संख्येने गावकरी जमा झाले होते. या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांची कसून चौकशी केली जात आहे. मुलाच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या 9 वर्षांच्या शाळकरी मुलीची हत्या करून तिला शेतात पुरण्यात आलं. या मुलीच्या मृत्युचं कारण अद्याप अस्पष्ट असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पाटलांच्या प्रथम जबाबानुसार खून झालेल्या मुलीच्या वडिलांनी मुलीचा खून केल्याची फिर्याद पोलीस पाटलांनी दिली आहे.
नक्की वाचा - Solapur news: विष प्यायला लावलं, कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं, पुण्यानंतर सोलापूर हादरलं
या प्रकरणी नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपी निश्चित करण्यात येईल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या चिमुकलीचा खून अघोरी प्रकारातून झालाय की लैंगिक अत्याचार करुन झालाय याची माहिती शव विच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.