दारूच्या नशेत आईला केली शिवीगाळ, मित्रांचा झाला संताप; अन्...

आईला शिवीगाळ करतो, म्हणून मित्रांचा राग अनावर झाला. रागाच्या भरात जे काही घडले ते फार धक्कादायक होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

- सौरभ वाघमारे, सोलापूर
दारूच्या नशेमध्ये स्वतःच्या आईला शिवीगाळ करत होता, म्हणून संतापलेल्या मित्रांनी तरुणाला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील बाळे येथील तोडकर वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. लखन रघुनाथ गायकवाड असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. 

(नक्की वाचा: मुंबईतील बड्या उद्योजकाला पोलिसानेच घातला 25 लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?)

नेमके काय घडले? 

दारूच्या नशेमध्ये लखन गायकवाड स्वतःच्याच आईला शिवीगाळ करत होता म्हणून त्याचे मित्र नागेश कोळे, आशुतोष उर्फ अवी राजू गाडेकर या दोघांनी त्याला लाकडी दांडक्यांसह काठीने मारहाण केली. या मारहाणीमध्ये लखनचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास लखन आई अलका गायकवाड यांच्याकडे दारूसाठी पैसे मागत होताा. पण आईने नकार दिल्याने तो शिवीगाळ करू लागला. यावेळेस नागेश आणि आशुतोषने आईला शिवीगाळ करू नको, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण लखन काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता.

Advertisement

(नक्की वाचा: कर्ज फेडण्यासाठी नातवाने उचलले टोकाचे पाऊल, 80 वर्षीय आजीविरोधात रचला गंभीर कट)

अखेर संतापलेल्या नागेश व आशुतोषने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मित्रांनी केलेल्या मारहाणीमध्ये लखन गंभीर स्वरुपात जखमी झाला, यातच त्याचा मृत्यू झाला. मारहाणीमध्ये लखन जखमी झाल्याने घराजवळ राहणाऱ्या नर्सला बोलावण्यात आले. नर्सने प्राथमिक तपासणी केली आणि यानंतर लखनला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी लखनला मृत घोषित केले. दरम्याान, नागेश ज्ञानेश्वर कोळेकर आणि आशितोष ऊर्फ अवी राजू गाडेकर या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

(नक्की वाचा: दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोची हत्या; आरोपी पती फरार)

'लखनला मारू नका...'

'लखन दारूच्या नशेत आहे, त्यामुळे मारहाण करू नका'; असे त्याची आई वारंवार सांगत होती. पण नागेश व आशुतोष यांनी काहीही ऐकले नाही. दरम्यान या प्रकरणी नागेश - आशुतोषला पोलिसांनी अटक केली आहे. 

VIDEO: Bhavesh Bhinde Arrested | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतला आरोपी भावेश भिंडेला अटक 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world