Killed Wife : पत्नीशी गप्पा मारता मारता तिचा चेहरा-गळा रक्तबंबाळ केला, कोल्हापुरात प्रेमाचा भयंकर शेवट

धक्कादायक बाब म्हणजे अश्लील वर्तनामुळे आरोपीला सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. आणि हा आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

कोल्हापुरात भारतीय सैन्य दलातून बडतर्फ केलेल्या तरुणाने आपल्या पत्नीचा अत्यंत निघृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्याच्या पत्नीचा मृतदेह कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी आढळून आला. 

NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपीचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत असून पत्नीचं नाव शुभांगी आहे. चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील ज्योतिबा डोंगराच्या निर्जनस्थळी चाकूने वार करून चारित्र्याच्या संशयावरून सचिनने पत्नी शुभांगी हिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. सचिन आणि शुभांगी कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरावर गेले होते. येथे गप्पा मारत असताना सचिन याने बेसावध असणाऱ्या शुभांगीवर चाकूने चेहरा, गळा आणि पोटावर वार केले. 

Advertisement

नक्की वाचा - Road Accident : पोटाची खळगी भरण्यासाठी परगावी निघाले, 22 ऊसतोड मजुरांच्या वाहनाचा अपघात, दोघांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी

भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावणाऱ्या सचिन याने महिलेसोबत अश्लील वर्तन केल्यामुळे सैन्य दलातून बडतर्फ केलं होतं. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी सचिन दुचाकीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला.  'मी कोल्हापूर येथून आलो असून.. मी माझ्या पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. सोलापूर पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून खातरजमा करून घेतली. आरोपी सचिन याने कोल्हापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर कासारवाडी डोंगर पालथा घातल्यानंतर पत्नी शुभांगीचा मृतदेह सापडला. आरोपी सचिनने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावर तिची हत्या केल्याची माहिती आहे. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world