
आपलं घर सोडून ऊसतोड कामगार परगावी कामासाठी जातात. अनेकदा मुलाबाळांसह परगावात कित्येक महिने ऊसाच्या मळात राबत असतात. तर कधी कुटुंबाला घरी सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतरित होतात. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २२ ऊसतोड कामगारांना घेऊन छोटा हत्ती वाहन फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे निघाले होते. त्यादरम्यान गाडीसमोर एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक दाबला आणि वेगाने असलेलं वाहन पलटी झालं. या छोट्या टॅम्पोने दोन ते तीन पलटी मारल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा च Sugar Production : हवामान बदलामुळे ऊस शेती तोट्यात; 24 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची भीती
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील येसगाव जवळ ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा छोटा हत्ती दुचाकीला वाचविण्याच्या नादात पलटला. यामध्ये दोन कामगार जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी झाले. यात संदीप मकरंद गोफणे आणि संजय साहेबराव गायकवाड अशी मयतांची नावे आहेत.कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून २२ ऊसतोड मजुरांना घेऊन छोटा हत्ती वाहन फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे निघाले होते. खुलताबादजवळील येसगावजवळ समोर अचानक एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या नादात छोटा हत्ती पलटी झाला. वाहनाने दोन ते तीन पलट्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world