खिशातून मोबाईल काढण्यावरून वाद, मित्राच्या डोक्यात दगड घातला; जागीच मृत्यू

Solapur News: अक्कलकोट रोडवरील एका हॉटेलमध्ये शेकुंबर शेख, श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लिनाथ माशाळे हे तिघे मित्र जेवायला गेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

सोलापूरच्या समाधान नगर परिसरात रविवारी मध्यरात्री एका किरकोळ वादाने भीषण वळण घेतले. दारू प्यायला बसलेल्या तीन मित्रांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात एकाचा दगड घालून खून करण्यात आला. शेकुंबर महेबूब शेख (39) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

नक्की वाचा: पुणे हादरले! 24 वर्षांचा तरुण आणि अल्पवयीन मुलगी; त्या प्रेमप्रकरणाचा अंगावर काटा आणणारा खुलासा

आईवरून शिवी घातली, मित्राची सटकली

अक्कलकोट रोडवरील एका हॉटेलमध्ये शेकुंबर शेख, श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लिनाथ माशाळे हे तिघे मित्र जेवायला गेले होते. तिथे तिघांनीही भरपूर दारू प्यायली होती. नशा चढल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. खिशातील मोबाईल बाहेर काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी शेकुंबरने श्रीकृष्ण देशमुख याला आईवरून घाणेरडी शिवी दिली. ही शिवी ऐकून सोबत असलेल्या मल्लिनाथ माशाळेचा संयम सुटला आणि त्याने शेकुंबरच्या कानाखाली मारली. आधीच दारूच्या नशेत असलेला शेकुंबर कानाखाली बसल्याने जमिनीवर पडला.

नक्की वाचा: बीकेसी 'पॉड टॅक्सी'साठी 499 झाडांचा बळी! 117 झाडे कायमची हटवणार

डोक्यात दगड घातला, जागीच ठार

शेकुंबरला खाली पडलेलं बघितल्यानंतर संतापलेल्या श्रीकृष्ण देशमुखने बाजूला पडलेला एक मोठा दगड उचलला आणि शेकुंबरच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, शेकुंबरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण देशमुख आणि मल्लिनाथ माशाळे या दोघांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Topics mentioned in this article