Mumbai News: मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या 'पॉड टॅक्सी' प्रकल्पाचा मार्ग मोकळा होत असतानाच, पर्यावरणप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे (पूर्व) येथील बीकेसी परिसरात राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 499 झाडे बाधित होणार आहेत. यामध्ये पाम, गुलमोहर आणि पिंपळ यांसारख्या झाडांचा समावेश आहे.
झाडांच्या नुकसानीचा तपशील
महापालिकेने (BMC) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रकल्पाच्या जागेवरील एकूण 939 झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यात 499 यामध्ये 214 पामची झाडे आणि 285 इतर प्रजातींची झाडे आहेत. 117 झाडे पूर्णपणे हटवली जाणार आहेत. तर 382 झाडांचे पुनरोपण केले जाणार आहे. 440 झाडे आहे त्याजागी सुरक्षित ठेवली जातील.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत गाडी चालवण्यासाठी भरावा लागणार 'कंजेश्चन टॅक्स'? भाजप नेत्याचा BMC ला प्रस्ताव)
कुठे होणार पर्यायी वृक्षारोपण?
नियमानुसार, कापलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावणे बंधनकारक आहे. बीकेसीतील या झाडांच्या मोबदल्यात रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिरडोण गावात नवीन रोपे लावली जाणार आहेत. ही झाडे साधारण 15 ते 20 वर्षे वयोगटातील असल्याने त्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
या झाडांच्या कत्तलीबाबत 20 जानेवारी 2026 रोजी जाहीर नोटीस काढण्यात आली होती आणि 30 जानेवारी रोजी सार्वजनिक सुनावणी पार पडली. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी 'ट्री अथॉरिटी'कडे (वृक्ष प्राधिकरण) पाठवला जाणार आहे. पर्यावरणाचे नुकसान कमीत कमी व्हावे, यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केल्याचेही पालिकेच्या वृक्ष विभागाने स्पष्ट केले आहे. टाइम्स ऑप इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Sharad Pawar Health Update: शरद पवारांची तब्येत कशी आहे? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट)
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि खर्च
MMRDA द्वारे राबवला जाणारा हा प्रकल्प मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल असे मानले जाते. या प्रकल्प खर्च सुमारे 1,016.34 कोटी रुपये आहे. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सने या तंत्रज्ञानाची शिफारस केली असून, 2027 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world