'आई, मी शाळेत शिकतेय, मला मारू नकोस',.... म्हणून मोठी बचावली; 10 महिन्याच्या लेकीच्या हत्येनंतर आईचं भयंकर रुप

'आई' हा शब्द उच्चारताच मन मायेनं भरुन येतं. मात्र याच आईने आपल्या अवघ्या १० वर्षाच्या लेकरुची अत्यंत निघृणपणे हत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Solapur News : सोलापुरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 'आई' हा शब्द उच्चारताच मन मायेनं भरुन येतं. मात्र याच आईने आपल्या अवघ्या १० महिन्याच्या लेकराची अत्यंत निघृणपणे हत्या केली. या आईचं नाव पूजा योगेश खुर्दामळे आहे. या घटनेने सोलापूर हादरून गेलं आहे. ज्या लेकराला ९ महिने पोटात वाढवलं त्या निरागस बाळाची त्याची जन्मदात्री हत्या कशी करू शकते अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

'आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस'; म्हटलं... म्हणून बचावली दुसरी मुलगी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ही धक्कादायक घटना घडली. ही महिला २६ वर्षांची आहे. तिने १० महिन्यांपूर्वीच एक मुलीला जन्म दिला. तिला सहा वर्षांची एक मोठी मुलगीही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पतीच्या कथित छळाला कंटाळून या आईने आपल्या १० महिन्याच्या मुलीचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून खून केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे १० महिन्याच्या मुलीची हत्या केल्यानंतर आईने मोठ्या मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला. ही महिला सहा वर्षांच्या मोठ्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” अशी आर्त विनवणी केल्यानंतर आईने तिला सोडून दिल्याची माहिती आहे.

Advertisement

नक्की वाचा - भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; पुणे विद्यापीठाची मदत, 40 तासांचा थरार, 43 आरोपींना मोठी शिक्षा

हत्येनंतर मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन आरोपी महिला थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. “माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केली, मला अटक करा,” अशी कबुली महिलेने यावेळी दिली. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी १० महिन्यांच्या शक्तीला मृत घोषित केलं आहे. मोठी मुलगी तेजल हिने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध BNS कलम १०३(१) आणि १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.


 


Topics mentioned in this article