Solapur News: गर्भवती तरुणी X-ray काढण्यासाठी रुग्णालयात आली, एक्स रे काढण्याच्या नावावर तिच्या सोबत...

सोलापूर महापालिकेचं रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सोलापूर येथील रामवाडी आरोग्य केंद्रात गर्भवती महिलेसोबत एक्स रे काढताना गैरवर्तन.
  • टेक्निशिअन गुरुप्रसाद इनामदारने केले गैरवर्तन. निलंबनाची करण्यात आली कारवाई.
  • पीडित महिलेला धक्का बसल्यानंतर तिने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सोलापूर:

सौरभ वाघमारे 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसें दिवस गंभीर होत चालला आहे. घर असो की कार्यालय, रस्ता असो की सार्वजनिक ठिकाण प्रत्येक ठिकाणी महिलांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे महिला खरोखर सुरक्षित आहेत का? असं बोलण्याची वेळ आली आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात तर ही महिला एका रूग्णालयात तपासणी करण्यासाठी गेली होती. पण तिला काय माहित की तपासणीच्या नावा खाली तिच्या सोबत भयंकर प्रकार घडणार आहे. याघटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. ही घटना सोलापूरमध्ये घडली आहे. 
   
सोलापूर महापालिकेचं  रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे. या ठिकाणी एक गर्भवती महिला एक्स रे काढण्यासाठी आली होती. सर्व आवश्यक बाबी पुर्ण केल्यानंतर ती एक्स रे रूममध्ये गेली. तिथं गुरुप्रसाद इनामदार नावाचा टेक्निशिअन होता. तोच एक्स रे मशिन ऑपरेट करत होता. त्यावेळी त्या महिलेला पुढे काय होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. एक्स रे काढायचा आणि घरी जायचं असं तिच्या डोक्यात चाललं होतं. पण पुढे भलतचं घडलं. 

नक्की वाचा - Shocking story: असा एक सोल्जर जो मृत्यू नंतरही असतो ऑन ड्युटी, दिला जातो नियमीत पगार, सुट्टी अन् प्रमोशन

या टेक्निशिअनच्या मनात वाईट विचार आले. त्याने एक्स रे काढण्याच्या नावाखाली या महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केलं. त्याने ही गर्भवती महिला हादरून गेली. तिने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला. तिने थेट आपले घर गाठले. झालेल्या घटनेनं तिला धक्का बसला होता. तिने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी ही वेळ न दवडता हा सर्व प्रकार पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कानावर घातला. शिवाय याबाबतची तक्रार ही त्यांच्या केली. झालेला प्रकार हा गंभीर होता. त्यामुळे तातडीने चौकशी करण्याचे आदेश ही देण्यात आले. 

नक्की वाचा - Model Tenancy Act: भाडेकरूंना दिलासा तर घर मालकांना आता पायबंद! भाडे करार करताना आता नवा नियम

चौकशी ही वेगाने करण्यात आली. ही चौकशी आरोग्य विभागाने केली. शिवाय त्याचा चौकशी अहवाल ही त्याच वेगाने महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. अहवाला वरून संबंधीत कर्मचारी गुरुप्रसाद इनामदार याला तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. या गंभीर घटना आहे. एक्स रे काढण्याच्या ठिकाणी असे कृत्य होत असेल तर काय करायचे असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. शिवाय निलंबनाची कारवाई पुरे नाही तर त्याला कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी केली जात आहे.  
 

Advertisement