Solapur News : सोलापूर-पुणे-कोल्हापुरातील 34 अल्पवयीन मुलींची धक्कादायक प्रकरणं उघड;डॉक्टरही भयंकर प्लानचा भाग

शहर आणि ग्रामीण भागातील बालविवाहाचे भीषण वास्तव महात्मा जोतिबा फुले या सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी आणलं उजेडात आणलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Solapur News : सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  सोलापुरातील महात्मा जोतिबा फुले सामाजिक संस्थांकडून अल्पवयीन मातांची माहिती दडवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात बालविवाहाला बंदी आहे. कोवळ्या वयात मुलींना लग्नबंधनात अडकवणं गुन्हा आहे. मात्र तरीही सोलापुरात बालविवाह झाले, इतकच नाही तर या मुली अल्पवयात गर्भवतीही राहिल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातून मोठी आकडेवारी समोर आली आहे.  

सोलापुरातील 34 अल्पवयीन मातांची माहिती दडवल्याचे प्रकार समोर आले असून याप्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यात दहा प्रकरणा विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  सोलापूर मनपा, खाजगी हॉस्पिटलमधील 85 अल्पवयीन मातांचा प्रकरण समोर आलं आहे. याघटनेनंतर सोलापूर शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.  

Advertisement

नक्की वाचा - 'आई...आई कडेवर घे ना...' धगधगत्या उन्हात मुलाच्या हट्टामुळे पारा सुटला; आईच्या कृत्याने कुटुंब हादरलं!

वैद्यकीय अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसूर

शहर आणि ग्रामीण भागातील बालविवाहाचे भीषण वास्तव महात्मा जोतिबा फुले या सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी आणलं उजेडात आणलं. सोलापुरात गेल्या दोन वर्षात 85 प्रकरणात पीडित मुली अल्पवयीन असताना विवाह करून सदर मुली गरोदर झाल्यानंतर उपचारासाठी सोलापुरात दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र यावेळेस पीडित अल्पवयीन मुलगी असल्याचं स्पष्ट असतानाही कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर गेल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक असताना डॉक्टरांनी माहिती दडवून ठेवल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार सोलापूर, पुणे, कोल्हापूर भागातील 34 प्रकरण उघडीस आली असून या प्रकरणी पती, नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांकडून पुढे तपास केला जात आहे. 

Topics mentioned in this article