जाहिरात

'आई...आई कडेवर घे ना...' धगधगत्या उन्हात मुलाच्या हट्टामुळे पारा सुटला; आईच्या कृत्याने कुटुंब हादरलं!

जंगलातील दरीत त्याचा मृतदेह सापडला. मुलाच्या डोक्यावर गंभीर जखमा होता. सोबत त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड होता.

'आई...आई कडेवर घे ना...' धगधगत्या उन्हात मुलाच्या हट्टामुळे पारा सुटला; आईच्या कृत्याने कुटुंब हादरलं!
AI Image

Mother Killed Son : छत्तीसगडमधील रायगढमध्ये एका आईने आपल्या अडीच वर्षांच्या लहान मुलाची निघृणपणे हत्या केली. त्याची चूक फक्त एवढीच होती की त्याने उचलून घेण्यासाठी आईच्या मागे तगादा लावला होता. त्यामुळे आई संतापली आणि तिने मुलाला उचलून आधी जमिनीवर आपटलं. यानंतर दगडाने त्याचं डोकं ठेचून ठार मारलं.

ही थरकाप उडवणारी घटना कापू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे १६ एप्रिल रोजी अडीच वर्षांचा अनुज अचानक बेपत्ता झाला होता. तपासानंतरही तो सापडला नाही तेव्हा कुटुंबीयाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसांनंतर जंगलातील दरीत त्याचा मृतदेह सापडला. मुलाच्या डोक्यावर गंभीर जखमा होता. सोबत त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड होता. मुलगा शेवटी त्याच्या आईसोबत दिसला होता. अशात पोलिसांनी त्याची आई सोनमती मंझवारशी चौकशी केली. मात्र ती पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरं देत होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवित तिने जे काही सांगितलं त्यानंतर पोलिसांना धक्काच बसला. 

नक्की वाचा - Tuljapur News : पहाटे राख सावडायला गेले अन् कुटुंब हादरलं; मृत महिलेची कवटीही..., तुळजापुरातील भीतीदायक प्रकार

कडेवर घेण्याचा हट्ट अन् आईचा संताप अनावर..

आरोपी आईने सांगितलं की, चार वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षांच्या अनुजला सोबत घेऊन ती जांभूळ तोडायला जंगलाच्या दिशेने जात होती. रस्त्यात रागाच्या भरात त्याने स्वत:च्या अडीच वर्षांच्या मुलाला जमिनीवर आपटलं आणि दगडाने डोके ठेचून मारलं. लहानग्याची चूक इतकीच होती की, तो तीव्र उन्हात आईला वारंवार कडेवर घेण्यासाठी हट्ट करीत होता. आरोपी महिलेने आपला गुन्हा कबुल करताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या कृत्यामुळे कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com