जाहिरात

Sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनमला जेलमध्ये मिळणार 'या' सुविधा, टीव्ही, जेवण अजून बरच काही...

राजा रघुवंशी हत्याकांडात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनमला जेलमध्ये मिळणार 'या' सुविधा,  टीव्ही, जेवण अजून बरच काही...

शिलाँग जेल हे सोनम रघुवंशीचे पुढील राहाण्याचे ठिकाण असेल. रिमांडनंतर सोनम इथेच येईल. राजा रघुवंशी हत्याकांडात दोषी आढळल्यास सोनम इथे जन्मभर राहील. तिला जेलमध्ये ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. सोनम या जेलमध्ये हत्येच्या प्रकरणात राहणारी दुसरी महिला कैदी असेल. हत्येच्या प्रकरणात दोषी ठरलेली एक महिला आधीपासूनच जेलमध्ये आहे. या जेलमध्ये एकूण 496 कैदी आहेत. त्यात फक्त 19 कैदी या महिला आहेत. 

 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा 

सोनमसोबत जेलमध्ये कोण असेल?
शिलाँगच्या जेलमध्ये येणारी सोनम 20 वी महिला कैदी असेल.सोनमला जेल वार्डनच्या ऑफिसजवळ बनवलेल्या जेलमध्ये ठेवले जाईल. तिच्यासोबत 2 महिला कैदी असतील.त्या तिच्यावर लक्ष ठेवतील. सोनमवर 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याने नजर ठेवली जाईल. ती काही चुकीचे पाऊल उचलू नये आणि तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तयारी केली जात आहे.

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

सोनम जेलमध्ये काय काम करेल?
सोनमला टीव्ही पाहण्याची सुविधा मिळेल. शिवाय जेलच्या नियमांनुसार घरच्यांना भेटण्याची आणि बोलण्याची सुविधा ही मिळणार आहे. सोनमला भेटणाऱ्यांची नावे जेल प्रशासनाला द्यावी लागतील. सोनमला जेलच्या नियमांनुसार नाश्ता, लंच आणि डिनर मिळेल. तिला जेलमध्ये इतर महिला कैद्यांसोबत शिवणकाम आणि कौशल्य विकासाशी संबंधित इतर कामे देखील करावी लागतील.

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...

सोनमने राजाला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला
राजा रघुवंशी हत्याकांडात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशीने राजावर एक-दोनदा नाही, तर चार वेळा हल्ला केला होता. पहिल्या तीन प्रयत्नांत राजा वाचला. पण चौथ्या प्रयत्नात सोनम रघुवंशी आणि तिचे साथीदार यशस्वी झाले. पोलिसांनी खुलासा केला आहे की सोनम रघुवंशीसह इतर आरोपींनी यापूर्वी तीन वेगवेगळ्या ठिकाणी राजाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. परंतु काही कारणांमुळे ते त्याला मारू शकले नाहीत. पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'राजा रघुवंशीची हत्या प्रत्यक्षात चौथ्या प्रयत्नात झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com