पायलट असलेल्या सृष्टी तुलीने राहत्या घरी फाशी घेतली होती. या प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक गोष्ट पोलिस तापासात समोर आली आहे. 25 नोव्हेंबरला फाशी घेण्या आधी सृष्टीने आत्महत्या करण्या आधी आपला प्रियकर आदित्य पंडित याला व्हिडीओ कॉल केला होता. ज्या दिवशी तीने फाशी घेतली त्या दिवशी या दोघांमध्ये भांडणी झाली होती असा पोलिसांचा संशय आहे. भांडण झाल्यानंतर आदित्य हा दिल्लीसाठी निघाला. पण त्याने आपल्या बरोबर थांबावे असं सृष्टीला वाटत होतं. पण त्याने तिचे काही ऐकले नाही. तो दिल्लीसाठी रवाना झाला. त्याच वेळी तिने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली.पण आदित्यने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यानंतर तिने आदित्यला व्हिडीओ कॉल केला आणि आपण कशी फाशी घेत आहोत हे दाखवून दिलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आदित्याने सृष्टी बरोबर जी चर्चा केली होती, ते चॅट डिलीट करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना अजूनही वाटतं की आदित्य काही तरी लपवत आहे. पोलिसांनी त्याच्याकडे त्याने डिलीट केलेल्या चॅट बद्दल विचारणा केली. त्यावर त्याने सांगितले की तुलीला मी बोललो होतो की तु जर मेली तर मी पण आत्महत्या करेन. आदित्य हा मानसीक त्रास देत होता असा सृष्टीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. गेल्या दोन वर्षापासून हे दोघेही प्रेम संबधात होते. आदित्य सृष्टीला त्याच्या मर्जीनुसार वागायला सांगत होता. त्यामुळेच ती खुप त्रासली होती. तो तिच्यावर शाकाहारी जेवणासाठी दबाव टाकत असतं. शॉपिंगला गेले तरी त्यांच्यात भांडण होत असतं. तर कधी नॉनव्हेज खाण्यावरून ही ते भांडत. हे नेहमी होत होतं. आदित्यला नॉनव्हेज खाणं आवडत नव्हतं.
ट्रेडिंग बातमी - बंद खोलीत पायलट तरुणीचा मृतदेह, बॉयफ्रेंडला अटक; अंधेरीत काय घडलं?
आदित्यचा फोन पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ञांकडे दिला आहे. त्याच्या फोनचा डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. शिवाय ज्या वेळी आत्महत्या झाली त्यावेळी या दोघांमध्ये 10-11 वेळा फोन झाला होता असंही पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय सृष्टीच्या फोनवरही अनेक मीसकॉल असल्याचे समोर आले आहे. सृष्टी आत्महत्या करत होती. तिने हे करू नये यासाठी आपण तिला वारंवार फोन करत होतो असा दावा आदित्यने केला आहे.