मुंबई: स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय पायलट तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सृष्टी तुली असं या वैमानिक तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एअर इंडियाच्या 25 वर्षीय महिला पायलट मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिचा प्रियकर आदित्य पंडित याने हत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नक्की वाचा: राष्ट्रवादीत 'गुलाबी वाद'! पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावले; कारण काय?
एअर इंडियाची पायलट असलेल्या सृष्टी तुलीचा मृतदेह तिच्या अंधेरी येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात सृष्टीने आपल्या राहत्या घरीच गळफास घेत आयुष्य संपवल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिचा २७ वर्षीय प्रियकर आदित्य पंडित याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
पंडित तिच्याशी गैरवर्तन करायचा आणि फोनवरून अनेकदा वाद घालायचा. तसेच तिला नॉन व्हेज खाण्यापासून थांबवायचा. त्यामुळे सृष्टीने हे पाऊल उचलल्याचा आरोप सृष्टीच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही तक्रार मुलीच्या काकांनी पोलिसात दिली असून, पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.
महत्वाची बातमी: CM पदाचा दावा सोडला, भाजपकडून एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव; बावनकुळे काय म्हणाले?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world