आकाश सावंत, बीड: बीडमधील गुन्हेगारी, खून, मारामाऱ्यांच्या घटना काही थांबताना दिसत नाहीत. क्षुल्लक कारणावरुन बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्यांचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. बीडच्या एका महाविद्यालयामध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्का लागल्यावरून टोळक्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यावेळी वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचेही हल्लेखोरांनी डोके फोडले. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Pimpri Chinchwad: गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा; शिक्षकाचे विद्यार्थिंनीसोबत वर्गातच भलते चाळे
समोर आलेल्या माहितीनुसार, वर्गात जाताना धक्का लागल्याच्या कारणातून एकाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. धक्का लागल्यानंतर संबंधित मुलाने माफीही मागितली मात्र किरकोळ कारणावरुन नववीच्या विद्यार्थ्याचा इगो हर्ट झाला. यातून त्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याला मारण्यासाठी गल्लीतील 10 ते 15 मित्रांना बोलावून घेतले.
संबंधितांनी फायटर आणि रॉडने विद्यार्थ्याला मारहाण केली. यावेळी मारहाण होत असलेल्या मुलाचा चुलत भाऊ त्याला वाचवण्यासाठी आल्यावर संशयितांनी त्याचेही डोके फोडले. मारहाण झालेल्या दोघे वाचण्यासाठी शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये पळाले. मात्र टोळक्याने तिथेही जाऊन धुडगूस घातला. बीडच्या एका विद्यालयात हा सर्व प्रकार घडण्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाल्या असून याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur Crime: डॉक्टरसह 14 शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये लुटले, कोल्हापुरात खळबळ, प्रकरण काय?