Satara News: हल्ली कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल, याचा नेम नाही. त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे रागाच्या भरात एखादी व्यक्ती कोणते पाऊल उचलेल, हे देखील सांगता येत नाही. रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने अतिशय गंभीर कृत्य केल्याची माहिती समोर आलीय. त्याने थेट रुममेटची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडालीय.
नेमके काय घडलं?
अभ्यास तसेच मोबाइलच्या अतिवापरावरून रूममेटला समज दिल्याने अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या रुममेटमध्ये भांडण झालं. अल्पवयीन मुलाला समज देणारा थोड्या वेळाने झोपी गेला. हीच संधी साधत अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात झोपलेल्या तरुणाचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याच्याच कमरेच्या पट्टयाने गळा आवळून त्याचा जीव घेतला. सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. गणेष संतोष गायकवाड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
(नक्की वाचा: Woman Molestation News: आणखी एका पोलिसाचं तत्काळ निलंबन, भररस्त्यात महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप)
तो सल्ला गणेशच्या जीवावर बेतला
22 वर्षीय गणेश हा लोणंद एमआयडीसी परिसरात काम करत होता. एकाच खानावळीत जेवत असताना त्याची अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. आरोपी मुलगा शिक्षणासाठी लोणंद येथे भाड्याने राहत होता. दोघांची अर्धे-अर्धे भाडे देऊन एकत्र राहण्यास सुरुवात केली. सोमवारी (27 ऑक्टोबर) गणेश गायकवाड याने मोबाइलच्या अतिवापरावरून मुलाला समज दिली. यामुळेच त्यांच्यात वाद झाला आणि या वादाने टोक गाठलं. गणेश झोपेत असताना अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली.
(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: हॉटेल रुम, फोटो नाराजीनंतर आणखी एक धक्कादायक माहिती, बदनेनं लपवलाय महत्त्वाचा पुरावा?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

